-
स्त्री. १ गड्डी ; चवड ; रास ; ढीग . सदा उच्छिष्टांच्या उचलिसि असंख्यात चळथा । - सारुह ६ . १५२ . तेथल्या पत्रावळीच्या चळथींतली एक पत्रावळ आण . २ समुदाय . म्हणूनि असुराचिया चळथा । पार्था उजू धाविन्नल्या । - मुआदि ४९ . ११० . ३ फोड ; फांक ; तुकडा . फाडूनि वदन केल्या चळथा । - निगा १८ . ४ चक्र ; फेरा ; पाळी . अमृत म्हणे हरिभजनें चुकती जन्ममरण चळथा रे । - अमृत ११५ . ५ रांग ; पंक्ति . मम क्षेमें चालती चळथा । कपिपुंग वाचिया । - कृमुरा २ . ७८ . चळथणें , चळतणें - उक्रि . रचणें ; रास करणें . [ सं . चलित ? ]
-
ना. गड्डी , चवड , थडी , थप्पी ( मुद्दाम रचलेले );
-
ना. गंज , डोंगर , ढिगारा , ढीग , ढीगभर , ढेर , रास .
-
See : ढिग, गड्डी, चवड
Site Search
Input language: