-
पु. १ श्वास . ( ल . ) प्राण ; जीव . २ धाप ; हवावी ; सुसकारा ; प्रमाणाधिक श्वासोच्छवास ; कष्टाने श्वास टाकणे . ३ स्वतःबद्दलची फाजील कल्पना ; अहंमान्यता ; अहंकार ; महत्त्वाकांक्षा ; गर्व ; बढाईखोरपणा . ४ क्षण ; पळ . ५ जोम ; हिम्मत ; निश्चय ; विश्वास ; तेज ; धीर . ६ शक्ति ; सत्व ; चांगलेपणा ; सामर्थ्य , गुण ( औषधांचा ). ७ श्वास कोंडून धरण्याची शक्ति ; अवसान . तुझा दम मोठा म्हणून तूं बूडून राहतोस . ८ कायम ओलसरपणा , दमटपणा ( जमीनीचा ). ९ एखाद्या वाद्यांतील हवा ( वाजविण्यासाठी कोंडलेली , भरलेली ). १० वाफ देणे ( मंदाग्नीवर ठेवलेल्या अन्नास ). ११ धूम ; पखवाज , संबळ इ० कांचा खर्ज सूर . १२ हिम्मत ; जोम ; शक्ति ; धीर ; दृढनिश्चय ; सहनशक्ति इ० उठावणी करण्याची , प्रोत्साहित करण्याची , पाठपुरावा करण्याची शक्ति ( संपत्ति , अधिकार , उद्योग यांची ); व्यापारधंद्यांतील भरभराट ; किफायत ; व्यापारातील ऐपतगिरी ; गब्बरपणा . १३ . धान्याचा सकसपणा ; केळी वगैरे पदार्थाचा ( पोटांत ) पुष्कळ वेळपर्यंत भूक न लागता राहण्याचा गुण ; जुन्या , वापरलेल्या वस्तूंची अधिक टिकण्याची शक्ति ; पुष्कळ वेळ बार उडण्याची ( तोफ , बंदूक इ० ) शक्ति . १४ झुरका ( गुडगुडी , चिलीम इ० चा ). ( क्रि० घेणे ; पिणे ; खेंचणे ; ओढणे ; लावणे ). १५ जोर ; शक्ति . पावसाने पिकास दम आला . १६ धमकी . [ सं . दम ; फा . ] ( वाप्र . )
-
पु. आत्मसंयमन ; इंद्रियदमन ; सहनशीलता ; मनोविकार दाबांत ठेवणें [ सं ] दमक - वि . दाबणारा ; सहन करणारा ; सहनशील .
-
०कोंडणे १ श्वास कोंडणे ; श्वासाचा अवरोध होणे . २ हिंमत , उत्साह खचणे .
-
०खाणे १ थांबणे ; श्वास घेणे ; थोडा वेळ स्वस्थ बसणे . २ वाट पाहणे ; धीर धरणे .
Site Search
Input language: