-
न. १ वीट ; किळस ; चिणका . २ विकृति पहा . - वि . १ रूपांतर , बदल झालेला ; बदललेला . २ तिटकारा , वीट आलेला . ३ मन उडालेला ; विन्मुख झालेला ; तोंड फिरविलेला . ४ दुर्दर्श ; विक्राळ . ५ बिघडलेला . [ सं . वि + कृ = करणें ] सामाशब्द -
-
f Any disorder. Any passion.
-
०जाति स्त्री. ( संगीत ) ज्या स्वरावरून एखाद्या जातीस तिचें नांव दिलेलें असतें व जिच्यांत तोच न्यास स्वर असून बाकीच्या स्वरांबद्दल नियम नसतो ती जाति . यांची संख्या अकरा आहे . षड्जकैशिकी , षड्जोदीच्यावा , षड्जमध्यगा , गांधारोदीच्यवा रक्तगांधारी , कैशिकी , मध्यमोदीच्यवा , कर्मारवी , गांधारपंचमी , आंध्री , नंदयति . [ सं . ]
-
०स्वर पु. ( संगीत ) शुध्द स्वरापेक्षां ध्वनीनें कमी किंवा अधिक असा स्वर , विकृतस्वर हल्लीच्या पध्दतीमध्यें पांच मानितात . रागवर्गीकरणास पांचांपेक्षां जास्त विकृत स्वर मानणें सोयीचें नाहीं , हें मत पंधराव्या शतकापासून आजपर्यंतच्या ग्रंथकारांस मान्य झालें आहे . कलावंत शास्त्रज्ञ नसल्यानें त्यांच्यांत त्याबद्दल एकमत नाहीं . पांच विकृत स्वरांत ऋषभ , गांधार , धैवत , निषाद हे चार कोमल आहेत व मध्यम तीव्र आहे . ३६ इंच लांबीच्या तारेचा ध्वनि व २४० आंदोलनसंख्या षड्जस्वरास गृहीत धरल्यास , पांच विकृत स्वरांचीं आंदोलनसंख्या व तारेची लांबी खालीं लिहिल्याप्रमाणें आहे . | स्वर - नव्या मताच्या श्रुति - जुन्या मताच्या श्रुति - तारेची लांबी इंच - आंदोलन संख्या | कोमल ऋषभ ३ ६ ३३ ३ / ४ २५६ | कोमल गांधार ७ १० ३० २८८ | तीव्र मध्यम १२ १५ २५ ३ / ५ ३३३१ / २ | कोमल धैवत १६ १९ २२ १ / २ ३८४ | कोमल निषाद २० १ २० ४३२
Site Search
Input language: