-
अ.क्रि. १ ( कापड इ० ) आक्ररणें ; आंखुडणें . २ ( धान्य ; तेल , तूप , गूळ इ० पदार्थ मापांत , वजनांत ) कमी होणें . दोन मण गूळ आणला त्यांत पांच शेर घटला . ३ ( शरीर , अवयव इ० ) बळकट होणें ; मजबूत होणें ; भरदार बनणें ; सुदृढ बनणें . ४ ( शास्त्राभ्यास , कला , इ० व्यासंगानें ) घोकून घोकून घोटून घोटून पक्का होणें ; दृढता पावणें . गांवठी शाळेंतील मुलें अक्षर घटावें म्हणून बखरांच्या नकला करितात . - विवि ८ . ८ . १४८ . ५ ( शास्त्रांत , कलेंत मनुष्यानें ) तरबेज , निष्णात , कुशल होणें ; सरावणें . त्या कामामध्यें मी घटलों , माझा हात घटला , माझी बुध्दि घटली . ६ योग्य दिसणें ; शोभणें ; साजणें ; सजणें ; बेताचें होणें . ७ ( काव्य . ) कमी होणें ; शांत होणें ; नाहीशीं होणें ; शमणें . जैसे भाजिलें करवटें । तेणें क्षुधा न घटे । ८ घट्टे पडणें ; ( शिथिल अवयव ) दृढ होणें ; झिजणें . कटि खांदे वाहतां घटले । - मघ्वमुनि ( नवनीत पृ . ४४६ . ) [ सं . घट - ट्ट ]
-
To abate or decrease; to subside, go down, be appeased &c. Ex. जैसे भाजि- ले करवटे ॥ तेणें क्षुधा न घटे ॥.
-
अ.क्रि. घडणें ; होणें . घडणें पहा . ऐसेंनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । - ज्ञा २ . २०५ . जयाचेनि भवव्यथा तुटे । अज्ञानापासूनि सुटे । तो ईश्वर हें न घटे । काय म्हणूनि ॥ - विउअ ११ . २६ . [ सं . घट - घटन ]
-
v i Shrink. Decrease or waste. Grow firm. Be versed or practised.
Site Search
Input language: