-
पु. १ मुद्रा ; छाप ; शिक्का . ( क्रि० देणें ; करणें ; पाडणें ). आकार , रूप . ते न मोडतां अळंकारठसे । - एभा २८ . २६४ . २ ( आकृती इ० चा ). छाप मारण्याचें साधन , साचा , हत्यार . ३ ठोका ; धाव . ४ ( ल . ) मनावर पडलेले प्रतिबिंब ; समजूत ; ग्रह . ( क्रि० पडणें ). ५ ( ल . ) अधिकार ; छाप ; मान . परगणें पाटिल तुमचा सासरा जिकडे तिकडे ठसा । - पला ८६ . ६ ( ल .) प्रसिध्दि ; कीर्ति . आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं । - एभा ५ . १४७ . त्रिभुवनीं याचा । ठसा नलगे पुसावे । - तुगा २८५ . ७ प्रकार ; रीत . पावोनियां मुक्त दशा । देही भोग भोगी कैसा । त्यासि त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे । - एभा १० . ७३९ . ८ स्थिति . एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा । - एभा ११ . १०१७ . ९ ( व . ) कफाचा बेडका . १० अक्षरांचें चिन्ह ; धातूचा टाईप . [ सं . स्था ; ठसणें ; हिं . ठसा ] ठसील , ठसोल - वि . ठशांचें . कोठील म्हणाल ठसील नाणीं । - वेस्वसी ११ . ७९ . ठसेकागद - पु . स्टांपकागद . ठसेवाला - पु . ठसा बनविणारा माणूस ; इं . फौंडर ; पंचमेकर .
-
ना. चिन्हा , छाप , मुद्रा , शिक्का ;
-
ना. ओतणी , छापा , मूस , साचा . सोरा ;
-
noun एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण
Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
Site Search
Input language: