-
न. १ कांकण ; बांगडी . २ ( ल . ) स्त्रियांचें सौभाग्य ( कारण नवरा मेल्यावर स्त्री करभूषणे घालीत नाही ). करी लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल नाहो । - तुगा २८८ . दे जन्म अक्षयीं दे माझा चुडा । - मसाप २ . २१ . चूडा पहा . [ सं . चूडा = शेंडी , करभूषण ; कांकण ; का . चुडेय = सोन्याची बांगडी ] ( वाप्र . )
-
०भरणें लेणें - १ बांगडया भरणें ; सौभाग्यवती होणें . जन्मसावित्री चुडा ल्याली . - नामना ९२ . २ ( उप . ) भित्र्याप्रमाणें मागे सरणें , हटणें . सामाशब्द - चुडेदान - न . एखाद्या स्त्रीच्या नवर्याचा जीव वांचविणें ; एखाद्या स्त्रीचें सौभाग्य राखणें . [ चुडा + दान ] चुडेदान देणें - एखाद्या स्त्रीच्या पतीस मारण्याची वेळ आली असतां तिच्या सौभाग्याकडे लक्ष्य देऊन त्याचे प्राण वांचविणें ; सौभाग्य कायम राखणें . रुखमादेवी म्हणे देईं चुडेदान । संरक्षी रे प्राण भ्रताराचा । - तुगा तुमचे माझ्यावर किती उपकार झाले म्हणून सांगू , तुम्ही मला चुडेदान दिलेंत . - तोबं . चुडेदान मागणें - वैधव्य येऊं नये , सौभाग्य कायम , अखंडित रहावें अशी प्रार्थना करणें ; पतीचें जीवित , प्राण रक्षण व्हावें अशी विनंति करणें . चुडयावरची बांगडी - स्त्री . बांगडयांच्या विक्रीवर फुकट दिली जाणारी बांगडी .
-
ना. कंकण , काकण , बांगडी ;
-
ना. कडगुले , कडे , गोट , पाटली .
Site Search
Input language: