-
पु. चरा ; खड्डा ; खोचण . ' बाजार पेठेंतून रेडी तरीवर जाणार्या रस्त्यास मोठमोठे चरक पडल्यामुळें दोन गाड्यांची चाकें व धुरा मोडून गेलीं .' - बळवंत १९ . ११ . ४१ . ( ध्व .)
-
पु. १ उंसाचा रस काढावयाचा तेलाच्या घाण्यासारखा लांकडी घाणा , यंत्र . २ ( उप . ) दांत आणि जबडे ; टाळीं ; तोंड ( पीठ करण्याचें जणं यंत्र ). ३ कातण्याचें काम , धातुमय पात्रांवर नक्षी , कापसांतील सरकी काढून तो साफ करणें , किंवा दुसरीं अशाच प्रकारचीं कामें करण्यासाठीं जें यंत्र असतें तें ; उजळा देण्याचें , नक्षी करण्याचें यंत्र . ४ दळण्याचें , पीठ करण्याचें , वाटण्याचें यंत्र . पुरण वाटण्याचा चरक . ५ चक्कर मारणें ; फेरा घालणें ; गिरक्या घालणें . ६ ( ल . ) कोणतीहि एखादी गोष्ट सतत चालू राहणें ; सतत चालणारें काम . खाण्याचा लिहिण्याचा , स्वयंपाकाचा , पाहुण्यांचा चरक चालला आहे . ७ जिल्हई करण्याचें यंत्र . [ फा . चर्ख ; तुल० सं . चक्र - चक्कर ; चरक ] ( वाप्र . ) चरकीं धरणें - १ चरकावर लावणें , धरणें . २ ( ल . ) काचांत धरणें ; सक्त मेहनत करविणें ; सारखें खपविणें ( एखाद्याच्या कामांत , धंद्यांत , अभ्यासांत ); एखाद्या कामावर इकडे तिकडे न होऊं देतां कुंथविणें .
-
ad In amazement or bewilderment.
-
caraka or kha ad In amazement or bewilderment. Ex. माझी बुद्धि or अक्कल च0 झाली or मी च0 झालों.
Site Search
Input language: