-
पु. १ तरवार किंवा काठी यांचा जोराचा वार , मार , घाव , टोला , ' दोहों हातांनी कचका दिला । बेंबीपावता चिरित नेला । ' - ऐपो ६० . २ एकदम व जोराचा हिस्का ; ओढ . ३ जोर ; बळ ; आवेश ; कामाचा धबडगा , सपाटा , झपाटा . ' सध्या कामाचा कचका भारी .' ४ निष्काळजीपणानें , धुसमुसळेंपणानें वापर , वागवणी ; अतिशय ताण . ' याच्या कचक्याखालीं हें धोतर टिकावयाचें नाही .' ५ रोखटोकपणा ; तडफ ; तापटपणा . ' त्या सुभेदाराचा कचका कठिण .' ६ भीतीमुळें एकाएकीं बसणारा धक्का ; मनावर होणारा परिणाम . ( क्रि० खाणें ; बसणें ). ( कच , कचक )
-
v खा, and in. con. बस.
-
m A sounding stroke; a sudden and smart pull; a shock.
Site Search
Input language: