-
पु. १ एक पक्षी हा मानससरोवराकडे असतो . बदकापेक्षा मोठा व पांढरा असून दूध आणि पाणी एकत्र केलें असतां त्यांतून दूध निवडून पिणारा , जबर उडणारा , पोहणारा पक्षी असा त्याचा लौकिक आहे . बदक ; वरट . २ ( ल . ) जीवात्मा . हंसविणें कुडी . - वमा . ३ संन्याशांतील एक भेद ; परमहंस ४ ब्रह्म ; परमात्मा . ५ विष्णु , सुर्य इ० देव . [ सं . ]
-
कंकणी - पु . ( संगीत ) एक राग . यांत षड्ज , तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , कोमल निषाद हे स्वर लागतात . आरोहांत ऋषभ व धैवत वर्ज्य जाति औडुव संपूर्ण , वादी पंचम , संवादी षड्ज . गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर .
-
०हंसगति हंसगामिनी - वि . हंसाप्रमाणे चालणारी ( स्त्री ). ध्वनी - पु . ( संगीत ) एक राग . यांत षड्ज . तीव्र ऋषभ , तीव्र गांधार , पंचम , तीव्र निषाद हे स्वर येतात . जाति औडुव - औडुव वादी षड्ज , संवादी पंचम वेळ रात्रीचा पहिला प्रहर .
-
०नाद पु. हंस , बदक यांचा किलकिलाट .
Site Search
Input language: