-
पुनर्नवा कुल, निक्टॅजिनेसी
-
पुनर्नवा कुल, निक्टॉजिनेसी
-
गुलबुश, पुनर्नवा, वसू, बुगनवेली इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल यांनी सेंट्रोस्पर्मी या गणात तर बेसींनी पाटलपुष्प गणात (कार्याएफायलेलीझमध्ये) व हचिन्सन यांनी रामेठा गणात (थायमेलेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- बहुधा औषधीय, कधी काष्ठयुक्त झाडे, झुडपे, वेली, पाने साधी, समोरासमोर, नियमित, द्विलिंगी, एकलिंगी, सच्छद फुले, परिदले पाच व जुळलेली आणि पाकळ्यासारखी असून खालचा भाग फळाभोवती कायम चिकटून राहतो. केसरदले बहुधा पाच तथापि कधी (१-३०) आणि एका ऊर्ध्वस्थ किंजदलाच्या किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, शुष्क फळ, एकबीजी, न तडकणारे आणि बीजात परिपुष्क
Site Search
Input language: