-
न. ( कों ) एक प्रकारचे गवत ; बेर .
-
पु. १ लागणारें सामान ; साहित्य ; साधनें ; सरंजाम ; कार्याला लागणार्या सर्व गोष्टी ( समुच्च्यार्थी ). २ नाचणारणी , गाणारणी , पोवाडेवाले , तमाशेवाले , जादूगार इ० मंडळीना लागणारी हत्यारे पातारें , साहित्य ; उपकरणी . साज सारंगी देत आणून । म्हणे नवरसे कुशलत्वपण । कळा दावी कुशळ कोणती । - नव १९ . ३८ . ३ गाण्यानाचण्याच्या वेळी पायांत घुंगरांचा चाळ बांधतात तो . ४ पोषाख ; जामानिमा ; शृंगार ( कलावंतीण , नट , शिपाई इ० चा ). ५ सज्ज , तयार होणें ; पोषाख घालणें . ६ ( सामा . ) नटण्यासजण्यासाठी लागणारा पोषाख , वस्त्रें , इ० ७ थाटमाट ; शृंगारमंडण ; नटणें . बहु दिवसी पति येतां करि बहु मिथिला पतिव्रता साज । - मोकृष्ण ८७ . १५ .. ८ पखवाज . ९ गळ्यांतील एक दागिना . [ सं . सज्ज ; फा . साझ् ]
-
०करी पु. वाजंत्री , गवई , तमासगीर , गोंधळी इ० च्या ताफ्यांतील इसम .
-
०भारा , साजारा - न . साज गवताचा भारा , ओझे . साजाची - वि . खार जमिनीचा एक प्रकार . हीत साजाचें किंवा बेराचें गवत उगवतें .
Site Search
Input language: