-
अ. क्रि .
-
स . क्रि .
-
वर येणें ; वर येण्याचे प्रकार -( अ ) पित्त , पुरळ , फोड , गळवें वगैरे शरीरावर उठणें , उत्पन्न होणें . गळूं कालच उचललें . ( आ ) पाण्यावर लाटा , बुडबुडे उत्पन्न होणें . जैशा उचलती लहरीवरी लहरी - दा ११ . ९ . १७ . ( इ ) जमिनीवर वारुळें , भोमे , उंचवटे तयार होणें . ( ई ) सारवलेल्या जागेवर खरपुड्या , पोपडे येणें ; वरचेवर सारवल्यानें जमीन लवकर उचलत नाहीं . ( उ ) आकाशांत ढग येणें . तेथें प्रळये मेघ उचलले । कठिण घोषें गर्जिन्नले । - दा १३ . ४ . १४ .
-
वर करणें - धरणें ; उठावणें . अंगीकारणें ; स्वीकारणें ; पत्करणें ( काम , भाग , भूमिका प्रांत ).
Site Search
Input language: