-
दाडिम कुल, प्युनिकेसी
-
दाडिमकुल, प्युनिकेसी
-
प्युनिका या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकाच वंशाचा अंतर्भाव असलेले कुल. याचा समावेश जंबुल गणात (मिर्टिफ्लोरीत) केला जात असे. हचिन्सन यांनी मेंदी (मेंदिका) गणात (लिथेलीझमध्ये) हे कुल घातले आहे. ग्रॅनेटेसी या नावानेही हे कुल ओळखले जाते. डाळिंब (दाडिम) ही परिचित जाती या कुलातील फक्त दोन जातींपैकी एक आहे. प्रमुख लक्षणे- काष्ठयुक्त वनस्पती, पाने साधी, बहुधा समोरासमोर किंवा मंडलित, फुले द्विलिंगी, आकर्षक, नियमित, संदले व प्रदले सुटी, ५-७, केसरदले अनेक, किंजदले अनेक व जुळलेली, किंजपुट अधःस्थ, बीजके अनेक, बीजावरण रसाळ, मृदुफळात अपुष्क बीजे, डाळिंब (Punica granatum L.)
Site Search
Input language: