-
न. १ मनन ; चिंतन . २ ( विशेषतः ) अष्टांग योगांतील वृत्तिनिग्रहरुप अंग , प्रकार ; मनाची एकाग्रता . ३ विषयाचे आकलन करण्याची शक्ति ; लक्ष्य . ही गोष्ट ध्यानांत येत नाही . ४ ईश्वराची मूर्ति किंवा चित्र इ० कांत आयुधभेद , वीरासनादि स्थितिभेद , उग्रता , सौम्यपणा इ० विशिष्ट गुणयुक्त दाखविलेले स्वरुप , मुद्रा . हे ध्यान उग्र आहे , ते ध्यान सौम्य आहे . सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया । - तुगा १ . ५ . परमेश्वराचे , एखाद्या देवतेचे स्वरुपवर्णन करणारी कविता , पद इ० . ६ ( व्यापक ) विशिष्ट रुप ; ढब ; मोडणी ; डौल ; चिन्ह ; तर्हा ; पद्धत . दोघे जण सावकारी करितात परंतु ते ध्यानच कांही निराळे . ७ ( उप . ) गबाळ व भोळसट मनुष्यः द्वाड व घाणेरडा मुलगा . श्रीमंताच्यापुढे हे ध्यान कां उभे राहणार ? - अस्तंभा १९१ . ८ लक्ष्य ; सावधगिरी ; अवधान . हे गडी खेळतील , विरंगुळतील तिकडे ध्यान असूं द्या . ९ स्मरण ; आठवण ; स्मृति . ही गोष्ट मी ध्यानांत ठेविली . १० शरीरावयांची विषयग्रहणाविषयी जागृति ; भान जाग्यावर असणे ; शुद्धि . मी निजून उठलो आहे . अजून पुरता ध्यानावर आलो नाही . ११ आवड ; पसंति . म्यां जे केले ते त्याच्या ध्यानास येत नाही . [ सं . ] ध्यानांत घेणे , येणे - ( एखादी गोष्ट ) पसंत पडणे ; आवडणे ; बरी अशी वाटणे . हे ऐकून मसलत सर्वांचे ध्यानांत आली . - भाब ५ . ध्यानास लागणे - ( एखाद्या गोष्टीचा ) ध्यास लागणे ; ( एखादी गोष्ट ) डोक्यांत घोळविणे ध्यानीमनी - क्रिवि . ( ध्यानांत - मनांत ) १ अंतःकरणाच्या अनेक अवस्थांभेदांच्या ज्या वृत्ती त्यांपैकी एका वृत्तीत ( अकरणरुपी प्रयोग ). आज पाऊस पडेल हे माझ्या ध्यानीमनी नव्हते म्हणून मी छत्रीवांचून बाहेर पडलो . २ अवस्थाभेदांनी होणार्या ज्या अंतःकरणाच्या अनेक वृत्ती त्या सर्वांना व्यापून . यांच्या ध्यानीमनी सर्वदा खेळ , म्हणून स्वप्नांत चावळला तरी बारा , तिरपगडे इ० बोलतो . [ ध्यान + सं . निष्ठा = निश्चययुक्त श्रद्धा ]
-
०मुद्रा स्त्री. १ देवतेचे ध्यान करतेवेळी धारण करावयाची मुद्रा , शरीराची ठेवावयाची विशिष्ट स्थिति , बैठक , आसन . २ ध्यान करतेवेळी होणारी भ्रुकुटी वांकड्या होणे इ० प्रकारयुक्त मुद्रा ; चर्या . [ ध्यान + सं . मुद्रा = चर्या ]
-
०योग पु. ईश्वरप्राप्तीचे ध्यानरुप , साधन ; अमूर्तचिंतन . [ ध्यान + योग ] ध्यानस्थ वि . १ ईश्वराचे ध्यान करण्यांत निमग्न झालेला , गढून गेलेला . देव आणि भक्त । तन्मय अति ध्यानस्थ । २ ( अशिष्ट ध्यानस्त ) विचार करण्यांत गुंग झालेला ; विचारमग्न . तुम्ही गोष्ट सांगितली तेव्हा मी ध्यानस्त होतो म्हणून ऐकिली नाही . [ ध्यान + सं . स्था = उभे राहणे ]
-
ना. एकाग्रता , चिंतन , ध्यास , मनन , सतत विचार ;
Site Search
Input language: