-
वि. ऐपतदार ; श्रीमंत . याच्या उलट नादार ; गरीब . [ फा . दार ]
-
शांतताद्वार .
-
न. कवाड ; दरवाजा बंद करण्याकरितां किंवा लावण्याकरितां केलेलें फळी , कांबट्या , तट्टा वगैरेंचें झडप . ( सं . द्वार )
-
न. १ दरवाजा ; ( घर इ० कांमध्ये ) प्रवेश करण्याचा रस्ता , वाट , मार्ग , द्वार ( अक्षरशः व ल . ) २ निघण्याची , बाहेर जाण्याची वाट ; दारे ; निकाल . ३ साधन ; रीत . [ सं . द्वार ; प्रा . दुवार , दुआर ; बं . दोयार ; हिं . दुआर ; झें . द्वर ; ग्री . थुर ; लॅ . फोरस ; गॉ . दौर ; भाज . तोर ; स्लॅ . द्वेरी ; लिथु . दूर्यस ; हिं . दोर - स ; इं . डोअर ] ( वाप्र . ) दारचा - वि . घरापुढे , परसांत लावून वाढविलेला ( भाजीपाला , फळे इ० ); घरचा . दारचे अळूं - न . परसूं , बाग इ० कांत मुद्दाम लागवड केलेले अळूं . पांढरे अळूं ; काळे अळूं कासाळूं ; दडगे अळूं , खाजाळूं इ० दुसरे अळवाचे प्रकार आहेत . दाराकडे जाणे - ( ना . बायकी ) मोरीवर जाणे . दारांत हत्ती झुलत असणे - एखाद्याची वैभवसंपन्न स्थिति असणे ; गजांत लक्ष्मी असणे . दारी जाणे - बसणे - लागणे - ( बायकी ) शौचास , परसाकडे जाणे इ० . दारी जाणे - दुखवटा घेऊन जाणे ; मृत मनुष्याच्या आप्तांचा समाचार घेण्यास जाणे . सामाशब्द -
Site Search
Input language: