-
नस्त्रीपु . १ भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी . २ ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज . ३ ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ . ४ नातें . ५ आलुतेबलुते . ६ ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . )
-
न. सहाय्यक वर्ग ; साथी . - आडिमहा ११ . ( सं . गोत्र )
-
पु. स्त्री . १ आचका ; गचका ; हिसका ; झोंका ( पतंग , वावडी यांस दिलेला ). ( क्रि० खाणें ; मारणें ; देणें ). २ बुचकुळी ; बुडी ( पक्ष्यानें मारलेली ). ३ ( ल . ) संकट ; विघ्ना ; पेंच ; ४ तोटा ; धक्का ; गचका ; तोटयाची बाब . ( क्रि० खाणें ; बसणें ). ५ थाप ; फसवणूक ; ठकवण . ( क्रि० देणें ). ६ व्यर्थ एरझार ; हेलपाटा ; हिसका . ( क्रि० खाणें ; बसणें ). [ अर . घोता ] ( वाप्र . )
-
०खाणें तोटा , नुकसान , पराभव , निराशा , दंड , इजा इ० प्रसंग ओढवणें , प्राप्त होणें ; अपेश येणें ; बुडणें ; फसणें . म्ह० ( गु . ) जेनुं काम तेने थाय बिजा करे सो गोता खाय .
Site Search
Input language: