-
महानुभवी वाड्मयांत व बाराव्या आणि तेराव्या शतकांतील जुन्या मराठी वाड्मयांत ओ किंवा वो ऐवजीं ' ॐ ' हें अक्षर लिहिण्याचा प्रघात होता . ' देॐ आत्मरमणु । मी कामबाणी विच्छिन्नु ॥ ' - ऋ ४६ .
-
अ. अ = विष्णु , उ = शिव , म = ब्रह्मा , ह्माप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे .
-
अ.
- वेद . पुराण , पोथी , स्तोत्र इ० म्हणण्यापुर्वी वसंपविल्यानंतर जो
पवित्र शब्द उच्चारतात तो ; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभी उच्चारावयाचा
शब्द . ' ओम् नमोजी गणनायका । '; ' ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य । '
- आरंभ ; उपक्रम . ३ प्रणवब्रह्मा ; शब्दब्रह्मा ; एकाक्षर ब्रह्मा . '
ॐनमोजी आद्या ॥ ' - ज्ञा १ . १ .
- वैदिक काळीं ( मांडुक्य उपनिषदांत ), अ
= वैश्वानर , उ = तैजस , म = प्राज्ञ , ओम् = अतर्क्य , अवाच्य व
ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्मा , असा अर्थ होता . ओम्
हें अक्षरें प्रथम उपनिषदांत आढळतें ,
-
०कार ओम् पहा .
Site Search
Input language: