-
अ. अ = विष्णु , उ = शिव , म = ब्रह्मा , ह्माप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे . १ वेद . पुराण , पोथी , स्तोत्र इ० म्हणण्यापुर्वी वसंपविल्यानंतर जो पवित्र शब्द उच्चारतात तो ; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभी उच्चारावयाचा शब्द . ' ओम् नमोजी गणनायका । '; ' ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य । ' २ आरंभ ; उपक्रम . ३ प्रणवब्रह्मा ; शब्दब्रह्मा ; एकाक्षर ब्रह्मा . ' ॐनमोजी आद्या ॥ ' - ज्ञा १ . १ . ३ वैदिक काळीं ( मांडुक्य उपनिषदांत ), अ = वैश्वानर , उ = तैजस , म = प्राज्ञ , ओम् = अतर्क्य , अवाच्य व ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्मा , असा अर्थ होता . ओम् हें अक्षरें प्रथम उपनिषदांत आढळतें ,
-
०कार ओम् पहा .
-
०तत्सत् ॐ (= ब्रह्मा ), तत् (= तें ), सत् (= खरें ,) फक्त ब्रह्मा हें खरें किंवा शाश्वत आहे . ' ओम् , ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु । ' मंत्र किंवा एखादें कर्म एखादें कर्म संपविल्यानंतर हें वाक्य म्हणण्याचा परिपाठ आहं . लक्षणेनें याचा अर्थ संपविनें , पाणी सोडणें असा आहे . ' ॐ तत्सत ब्रह्मार्पण सेवट । ' - दावि २६ .
-
०पुण्या पुण्याहम् - १ मी प्रणवरूप पुण्यस्वरुप आहें अशा अर्थाचा मंत्र . एखाद्या मंगल संस्कारापूर्वी स्वस्तिवाचन नांवाचें कर्म केलें जातें त्यामध्यें संस्कारकर्त्या यजमानास ब्राह्मण ' ओं पुण्याहं ' असा आशीर्वाद दंत असतात . ' चिंदब्रह्मोंसि लग्न लाविशी । ओं पुण्येसी तत्वता । ' - प्रभा ८ . १ . २ लग्न मंत्राचा आरंभ , पुण्याहवाचनाचे वेळीं म्हणण्यांत येणारें मंत्र . ' ॐ पुण्याह म्हणोनियां जाण । लाविलें उभयतांचें लग्न ॥ '- जै ५६ . २० .
Site Search
Input language: