-
pop सदां ad Always. Ex. सदा चालिजे धर्मपंथ ॥ सर्व कुमति टाकोनि ॥. Ex. of comp. सदाकष्टी, सदादुःखी, सदाभोगी, सदारड्या, सदारोगी, सदानंद or दी, सदाशुचि, सदासुखी. Sometimes to intensity or enhance the sense त्रिकाळ is added, as सदात्रिकाळ Perpetually, unfailingly through the three times, morning, noon, and evening; as गायी दुहति सदात्रिकाळ ॥ क्षीर तुंबळ वर्षिति ॥. सदा पीक सदा भीक A phrase descriptive of the perpetual poverty and wretchedness of the Kun̤bí whatever luxuriant crops may crown his fields.
-
ad Always, sometimes in comp., as सदाकष्टी, सदाभोगी.
-
सदा [sadā] ind. Always, ever, perpetually, at all times. -Comp.
-
क्रि.वि. नेहमीं ; सदोदित ; निरंतर ; सतत . हा सदां पाणिबुडा । युधिष्ठिरूं साबडा । - शिशु ८९४ . सदा सर्वदा योग तूझा घडावा । - राम . सदाकष्टी , सदादुःखी , सदाभोगी , सदारडया , सदारोगी , सदानंदी , सदाशुचि , सदासुखी असे याचे समासहि होतात . म्ह० १ सदा पीक सदा भीक = कुणब्याचें कितीहि पीक आलें तरी दारिद्रय जात नाहीं . २ सदा मरे त्याला कोण रडे = दुःखाची कांहीं काळानें संवय होते या अर्थी . सदा त्रिकाळ - नेहमीं ; सतत ; निरंतर ; तिन्ही त्रिकाळ ; सकाळ , दुपार , संध्याकाळ ( विशेष जोर दाखविण्याकरितां योजतात ). सदाकदा , सदानकदा , सदाकाळ - क्रिवि . नेहमीं ; निरंतर ; सतत ; सदोदित . सदावक्र - वि . नेहमीं वांकडा , दुर्मुखलेला , रुसलेला , हट्टी ; कष्टी ; उदास . सदा खाटलेकरी - वि . बिछान्यास खिळलेला . सदागति - वि . नेहमीं भ्रमण करणारा ; सारखा गतिमान असणारा ( हवा , वारा ). सदातन - वि . चिरंतन ; शाश्वत ; निरंतरचा ; कायमचा . सदाफळ - वि . नेहमीं फळें देणारें . जोडती दाटें झाडें । सदाफळ तीं । - ज्ञा ६ . १७३ . सदासर्वदा - क्रिवि . नेहमीं ; सतत . सदासिध्द - वि . शाश्वत ; चिरंतन ( परमेश्वर ).
Site Search
Input language: