-
वि. १ ( १ ज्याच्या गंडस्थळावर संरक्षणसाठीं ढाल बांधली आहे अशा लढाईंतील हत्तीप्रमाणे शूर , धीटमोल . २ ज्यावर सैन्याचें मुख्य निशाण आहे अशा म्होरक्या हत्तीप्रमाणें धीट ). अमर्याद ; निर्लज्ज उद्धट ( पुरुषाप्रमाणें बागणार्या स्त्रीविषयीं अथवा तिच्या शिरजोर , धीट , उद्धट , स्त्री जातीला अयोग्य अशा वर्तनाविषयी योजतात ). २ बेछूट ; दांडगी ; ताळतंत्र सोडेलेली ( स्त्री . तिचीं कृत्यें ). ३ . ( बायकी ) उपव्द्यापी ; उलाढाली ; दंगखोर ( मुलें व त्यांच्या खोडया ). ४ अतिशय मोठी व स्थूल ( स्त्री ). ५ दंगेखोर ; शिरजोर ; बेकायदेशीर ( मनुष्य ). ६ ( सामा .) निष्कारण उठाठेवी करणारा ; फाजील . [ ढाल = निशाण + गज = हत्ती निशाणाचा हत्ती मोठा असतो यावरुन ]. ढालगजपण - १ . उलाढाल ; उठाठेव . तयासि द्रव्य पाहिजे म्हणौन । केलें असंभाव्य ढालगजपण। - स्वादिओ २ . २ . १७ . ढालगज भवानी - स्त्री . १ . साहसाचे , आचरटपणाचें , अमर्याद , अनुचित कृत्य करणारी स्त्री २ . उलाढाली , उपव्द्यापी स्त्री .
-
न. जारणमारणांतील एक मंत्र , साधन , खेटक केली नाना कवटालें । पुत्र लोंभें केलीं ढालें। दा३ . ३ . ४५ .
-
न. पराक्रम ; अचाट कृत्य ; साहस . ' ज्या सरंजामवरी येवढें ढाल केलें त्याचा परिणाम कोणीकडे जाला बरें ?'
-
स्त्री. १ शत्रूपासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातडयाची किंवा कासवाच्या पाठीची केलेली वस्तु . २ निशाण ( सैन्याचे , मुख्य सरकारचें , किल्ल्यावरचें इ० ). ( क्रि० देणें ). ढाल दिली कात्रजेवर तळ पाःऊन - ऐपो ४४४ . ३ ( बायकी ) घांटी ; कंठमणि ; कंठ . ४ ( ल .) आसरा ; छत्र ; रक्षण करण्यास समर्थ असणारी व्यक्ति , तो गृहस्थ याअ गांवामध्ये मोठी ढाल आहे / - न . स्त्रियांनीं केलेलें धाडसाचे काम ; साहस ( क्रि० गिळणे ). [ सं .]
Site Search
Input language: