-
न. ( समुच्चयाने ) धुवावयाचे वस्त्र , कपडे . लोकांची धुणी धुणे - नेहमी दुसर्याचे दोष काढीत बसणे ; दौषेकदृष्टी असणे . ( वाप्र . ) धुणे झाडणे - कोणतेहि वस्त्र स्वच्छ धुऊन झाल्यावर ते वाळत टाकण्यापूर्वी त्याचा पिळा उलगडून , कांठ सांफ करणे व झटकणे .
-
स.क्रि. १ ( पाण्याने वस्त्र , पात्र इ० ) घासून स्वच्छ करणे . २ ( ल . ) नागविणे ; उघडा करणे ; पूर्णपणे स्वच्छ , साफ करणे हे क्रियापद सकर्मक असले , तर भूतकाळी कर्त्याप्रमाणे ( जेव्हां कर्म शरीर किंवा शरीरावयव असेल तेव्हां ) सुद्धां चालते . उदा० मी हात धुतलो , पाय धुतलो , अंग धुतलो . [ सं . धू ; प्रा . धुण ; सिं . धुअणु ] धुतले जाणे - ( घर ) लुबाडले जाणे ; आंतील जिन्नस , पैसा इ० नेण्यांत येणे . माझे सर्व घर धुतले जाईल । - विवि ८ . ११ . २१० . धुतलेला तांदूळ , धुतलेले मोती - पुन . १ सुंदर , सशक्त , टवटवीत , सतेज चेहर्याच्या माणसास म्हणतात . २ शुद्ध ; स्वच्छ ; निर्मळ ; निर्दोष . धुतलेला विस्तव - पु . कोळशाप्रमाणे काळाकूट्ट माणूस . धुतांच जाणे - थोड्या वेळांत , दिवसांत निरुपयोगी होणे ; कमी किंमतीचा , योग्यतेचा असणे .
-
verb पाण्याने स्वच्छ करणे
Ex. नदीवर बायका कपडे धुतात
-
०पाणी न. बायकांच्या रोजच्या गृहकृत्यांस ( व्यापकार्थी ) शब्द . कपडे धुणे , पाणी आणणे ; सारवणे इ० काम . [ सं . धू ]
Site Search
Input language: