-
Arts, wiles, stratagems, deceitful devices. Ex. माझा नाश करा- वा म्हणून हा अनेक प्रकारचे घा0 करतो. 3 Efforts, endeavors, schemes, plans. Ex. घा0 करून पाहावे काम साधलें तर साधलें.
-
m Suitableness of circumstances to any end. Grasp, reach, power. Arts, wiles.
-
पु. १ एखादी गोष्ट करण्याला अनुकूल स्थिति ; योग्य संधि , काल , प्रसंग . काळ घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव । - तुगा ३३८ . माझ्या घवाडावांत जेव्हां येईल तेव्हां मी घर बांधीन . २ कचाटी ; पकड ; तावड ; पेंच ; आवांका ; कबजा ; अधिकार . हातां आला घावडाव । आमुचा मायबाप देव । - तुगा ६४४ . हा ज्या दिवशीं माझ्या घावाडावांत सांपडेल त्या दिवशीं मी ह्याचें पारिपत्य करीन . ३ ( - अव . ) युक्त्या ; कपडाच्या शक्कली ; लुच्चेगिरीचे उपाय ; छक्केपंजे ; कावा ; डाव . माझा नाश करावा म्हणून हा अनेक प्रकारचे घावडाव करतो . ४ ( - अव . ) प्रयत्न ; खटपटी ; बेत ; हिकमती ; युक्त्या . घावडाव करून पहावे , काम साधलें तर साधलें . ५ घाव ; वार . निवडे घावडाव । व्हावा अंगीं । - तुगा २३०६ . [ घाव + डाव ; डाव द्वि . ]
Site Search
Input language: