-
See : छत्तीस, छत्तीस
-
छ्त्तीसाचा आकडा
यांतील तीन व सहा अंकाच्या आकृति एकमेकांकडे पाठ करून बसलेल्या माणसाप्रमाणें दिसतात. दांपत्यांत एकाचें तोंड पूर्वेकडे व दुसर्याचें पश्चिमेकडे अशा अर्थी प्रेमाचा अभाव असा अर्थ. (मराठी शब्दाचें उद्धाटन)
-
See : छत्तीस, छत्तीस
-
छत्तीस आयुधें
१ चक्र, २ धनुष्य, ३ वज्र, ४ खड्ग, ५ क्षुरिका, ६ तोमर, ७ कुंत, ८ शूल, ९ त्रिशूल, १० शक्ति, ११ पाश, १२ अंकुश, १३ मुद्रर, १४ मक्षिका, १५ भल्ल, १६ भिंडमाल. १७ मुसुंडी, १८ लुंठि, १९ गदा, २० शंख, २१ परशु, २१ पट्टिस, २३ रिष्टि, २४ कणय, २५ संपन्न, २६ हल, २७ मुसल, २८ पुलिका, २९ कर्तरि, ३० करपत्र ३१ तरवारी, ३२ कोद्दाल, ३३ दुस्फोट, ३४ गोफण, ३५ डाह आणि ३६ डबूस.
असे आयुधाचे छत्तीस प्रकार प्राचीन कालीं होते. ([वस्तुरत्नकोश])
Site Search
Input language: