Dictionaries | References

हियें

   
Script: Devanagari

हियें

  न. १ ( काव्य . ) छाती ; हृदय . तेणे दुःखें हिये फुटेल । - ज्ञा १ . २३४ . २ धैर्य . [ सं . हृदय ; प्रा . हिअय ; हिं हिया ]
०घालणें   छाती फुटणें ; काळजाचा ठाव सुटणे . जो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती । - ज्ञा १ . १६३ .
०फोडणें   अंतःकरण खुले करून गुप्त गोष्ट सांगणे . येणे माने जीवांचे हियें फोडावे । - ज्ञा ९ . ३५ . हिय्या - पु . हिम्मत ; धैर्य ; अवसानल छाती . [ हिं ] हिय्येदार , हिय्येबाज - वि . धाडसी ; हिंमतवान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP