-
पु. १ बन ; लागवड ( ऊंस , सुपारी , केळी , मिरच्या इ० ची ) २ ( कों . ) भूतांनी पछाडलेली जागा ; विशेषप्रसंगी भूतांची जमण्याची जागा . ३ ( क्व . ) मर्यादित जागा , स्थळ . ४ अर्धेलीने खोतास किंवा कुळाच्या एकंदर मिळून जमिनी , शेते . ६ घोडा , बैल इ० ची त्यांच्या गुणावरुन ठरविलेली जात ; बिजवट . ७ थारोळे ; तळे . तैसे बहुती बहुतकाळ सेवसेवूनि केले थळ । - मुरंशु ४१५ . ८ ( गो . ) देवस्थानची पंचक्रोशी . [ सं . स्थल ; प्रा . थल ] ( वाप्र . )
-
n A plantation. A place or spot.
-
2 C A haunt or lurking-place of evil spirits. 3 A place or spot. Used restrictedly. 4 The portion of the produce due from the अर्धेली to the खोत, or from an under-tenant to the landlord. 5 The farm or the grounds collectively of one tenant or proprietor. 6 A stock or breed. थळ घेणें-देणें-नेमणें-ठरविणें-मागणें To accept, grant, appoint &c. an umpire to settle disputes of field-proprietorship or boundaries.
-
०घेणे देणे नेमणे ठरविणे मागणे - जमीनीच्या मालकीची अथवा बांधाची भांडणे तोडण्यास कबूल करणे ; देणे ; नेमणे इ० . सामाशब्द - थळकर - पु . ( कु . ) गांवच्या देवस्थानच्या मांडणीतील निरनिराळ्या स्थानावरील अधिकारी . थळकरी - पु . मिरासदार . थळझाडा थळवारझाडा थळवारपत्रक - न . १ गांवच्या खेडुतानी वहितीस घेतलेल्या अथवा दिलेल्या जमीनीची नोंद , नोंदणीच तक्ता . २ ( सामा . ) यादी . जसे :- शेतांचा - मळ्यांचा - कुळांचा - गांवांचा - थळझाडा . थळपत्र - न . गोत देशक न्यायाधीश व राजा या मार्फतचा निवाडा . - गांगा ६० . थळभरीत - न . १ एखाद्या ठिकाणी माल विकत घेणे व भरणे . २ निर्गत मालावरील कर , जकात . ३ ( क्व . ) माल विकत घ्यावयाचे ठिकाण किंवा त्या ठिकाणचा माल . थळमोड - स्त्री . १ एखाद्या जागी थांबून , माल उतरुन विकण्याची जागा . २ आयात मालावरील जकात . ३ ( क्व . ) माल विकत घ्यावयाची जागा किंवा त्या ठिकाणचा माल . ४ तळ अथवा बिर्हाड हालविणे ; जागा सोडणे . थळवडी थळवाडी - स्त्री . मळणीची जागा ; खळे . थळवाईक - वि . उंसाच्या मळ्याचा मालक . थळवार - क्रिवि . थळांच्या अथवा निरनिराळ्या शेतकर्यांच्या अनुक्रमाने ( हिशेब इ० ). थळवार - झाडा - पत्रक - पुन . थळझाडा पहा . थळवारी - स्त्री . शेतजमीनीचे क्षेत्राच्या अनुक्रमाने तयार केलेले पत्रक , नोंद . याच्या उलट कुळवारी . सामाशब्द - थळकोकण - पु . ( कों . ) घाटाखालील प्रदेश ; तळकोंकण . थळचीपूजा - स्त्री . ( गो . ) पंचक्रोशीतील लोकांनी बांधलेली देवपूजा . थळथांबणी - स्त्री . व्यवस्था .
Site Search
Input language: