Dictionaries | References

हल्लाल

   
Script: Devanagari
See also:  हलाल

हल्लाल     

वि.  १ योग्य ; धर्म्य ; विहित ; न्याय्य ; अनिषिध्द ( खाद्य वस्तु , दान इ० देण्याचे पदार्थ ); विधीपूर्वक मारलेल्या पशूचें ( मांस ). मुलानानें फात्या न दिला तर बकरें मुर्दाड राहतें म्हणजे तें हलाल होत नाहीं . - गांगा ११३ . २ रास्त ; योग्य ; प्रामाणिक ; उत्तम ; कायदेशीर ( धंदा , नेमणूक , काम , फायदा , मिळकत , संपादन ). [ अर . हलाल् ‍ ]
०करणें   मुसलमानी धर्मशास्त्राप्रमाणें पशु मारणें ; जबा - जबे करणें . हलालाचा - वि . योग्य मार्गानें , न्यायाने मिळविलेला . संपादलेला .
०खार  पु. १ स्वतः श्रम करून खाणारा माणूस . २ भंगी ; झाडू . क्षेत्र मजकूरच्या गल्ल्या हलालखोराकडून झाडवून निर्मळ राखणें . - वाडसमा ३ . १२ . ३ हलकें काम करणारा माणूस . [ फा . हलालखुर् ‍ ] हलालखोरी - स्त्री . १ हलालखोराचा धंदा , स्थिति . २ हलका धंदा ३ प्रामाणिकपणा ; इमानीपणा . तुझे बाबें नरसो दामोधरें हुजूर हलालखोरी बहुत वजा सांगितली . - रा १५ . ३१ . - वि . हलालखोरासंबंधीं ( भाषा , वश इ० ). हलाली हरामी - स्त्री . प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणा ; बरेंवाईटपणा . - वि . बरेंवाईट ; भलाबुरा हलाली - हरामीची गांठ पडली तर यांस मारूं न द्यावी . - भाब ८१ . [ अर . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP