-
स्त्री. १ पालखीच्या वर वांकविलेला , मागे व पुढे सरळ असलेला व दोन्ही बाजूंस ( पालखी ) उचलणारांनी धरावयाचा वांसा , दांडा ; ( ल . ) पालखी . सवे साति लक्षां दांडिया । बारा लक्षु तेजिया । - शिशु २३४ . २ ( नांगर , वखर , कुळव इ० आउतांचा ) सोट , काठी . ३ गाडीची धुरा . ४ घोड्याचे शेपूट ; घोड्याच्या शेपटीचा बुडखा ; ढुंगणाजवळचा शेपटींचा भाग . घोडीयांच्या दांड्या तोडल्या . - रा १५ . २०६ . - विठ्ठलसीतास्वयंवर ६ . १६ . ५ ( अशिष्ट ) घोड्याचे शिस्न . ६ वस्त्रे इ० वाळत घालण्याकरिता उंचावर आडअवी बांधलेली काठी , बांबू इ० ७ तांब्याच्या जुन्या ढब्बूवरील दोन सरळ आडव्या रेघांपैकी प्रत्येक रेघ . असला दुदांडी ढब्बू छत्रपति शिवाजी महाराजांनी काढला होता . त्याच्या एका बाजूस दोन आडव्या रेघा असून दुसर्या बाजूवर तीन ओळींत अनुक्रमे शिव राजछत्र पति ही अक्षरे असत . ८ तराजूची पारडी ज्याला अडकवितात तो आडवा दांडा . ( ल . ) तराजू ; ताजवा . ९ समुद्रांत लांबवर गेलेला जमीनीचा चिंचोळा भाग ; दांड . उदा० ( मुंबईजवळील ) कुलाब्याची दांडी . १० वल्ह्याचा पतिंगा , दांडा ; यावरुन वल्हेकरी ; नावाडी . ११ छत्री , पंखा इ० तंतुवाद्यांचा डेर्याच्या , भोंपळ्याच्या वरचा तारा बसविलेला लांकडाचा भाग . १३ लांकडाचा तासलेला लांब तुकडा ; वांसा ; तुळवट . १४ मोठी व लांबवर पसरलेली लाट . १५ ( महानु . ) बेडी , काळ लोहाचा दांडी । आधारु कां घालवे । - भाए ५९५ . १६ . कान , कडी ( धरण्याची ) १७ ओलावा शोषून न घेणारी व लौकर सुकणारी थळ जमीन ; उंचवट्यावरील वालुकायुक्त , बरड जमीन . [ दांडा लघुत्वाने ]
-
स्त्री. केशयुक्त शेपटी ; वालहस्त ; वालधि . - मसाप ४५ . ७ .
-
०पूर्णिमा पुनव स्त्री . माघ शुद्ध पौर्णिमा . ह्या दिवशी होळीचा दांडा रोवतात म्हणून हे नांव पडले ; दांडेपूर्णिमा पहा . [ दांडी + पूर्णिमा , पूनव ]
-
noun काम ना करपाची वा कामार हाजीर नासपाची क्रिया
Ex. सोमाराक हांव दांडी मारतलों आनी भोंवपाक वतलों
Site Search
Input language: