Dictionaries | References

साळकाई

   
Script: Devanagari
See also:  माळकाई

साळकाई

  स्त्री. ( बहुधा अनेकवचनी प्रयोग ) कोणी तरी फालतूक , सटरफटर बाई . निंदार्थी वापरतात . सगळा थाट त्या माईसाहेबांचा आणि त्यांनीं जमविलेल्या साळकाया माळकायांचा . - पकोधे . [ सं . श्यालिका + मालिका . म . साळी ( का )+ माळका ] साळकेगोळके - पुअव . कोणी तरी माणसें ; फालतू , अलबतेगलबते . [ सं . श्यालक द्वि . ] साळकोजी माळकोजी - पु . १ वरील प्रमाणेंच अर्थ . २ गोमागणेश ; कोणी बडा माणूस ( निंदार्थी उपयोग ). तूं मोठा साळकोजीमाळकोजी लागून गेलास , मला ठाऊक आहे . [ सं . श्यालक + मालिका ; म . साळकमाळका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP