Dictionaries | References स सांगडी Script: Devanagari See also: सांगड Meaning Related Words सांगडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A float &c. सांगडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ दोन होडया किंवा नावा एकत्र बांधून केलेलें जलयान . २ ( स्त्री . ) दोन किंवा अधिक भोपळे , नारळ इ० फळें , जनावरें , माणसें यांना एकत्र बांधून केलेली रचना . एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया घोंडी । - ज्ञा ७ . ८४ . ३ ( सामा . ) तरून जाण्याचें साधन ; नाव ; होडी . योगी संस्कृति सागरांत म्हणती ज्याच्या पदा सांगडी । - मोकृष्ण २६७ . ४ जोडी ; सोबत ; मैत्री . शिंदे यांची जन्माची सांगड होती तों पावेतों ब्राह्मणांसही आमचा वचक होता . - भाब ३७ . ५ कातार्याच्या हत्याराचा एक भाग ; यानें तो कातावयाची वस्तु घट्ट बसवून ठेवतो . लांकूड कांतण्याची बैठक . [ सं . संघट्ट , संघाटिका = युग्म ] स्त्री. ( गु . ) विहीर खोदण्याच्या उपयोगाची एक लोखंडी पहार . हिच्या एका बाजूस अणकुचीदार टोंक व दुसर्या बाजूस आंकडा असतो . या आकडयांत दोर बांधून तो कप्पीवरून घेतलेला असून त्याचें टोंक विहिरीबाहेरील माणसांनीं हातांत धरून ती पहार विहिरींत सरळ जाऊन आपटेल व भोंक पाडील असें सोडावयाचें असतें .०घालणें संबंध जोडून देणें ; भेळ घालणें . वरील दोन कल्पनांची सांगड घालून दिली आहे . - टि ४ . ११ . सांगडीस धरणें - निकटसंबध्द होई असे संबंध्द करणें . २ ( व्यापक . ० सुटूं नये , इतस्ततः होऊं नये म्हणून बांधून ठेवणें . सांगडणी - स्त्री . एकत्र गुंतविणें , जोडणें . सांगड बाहुली - स्त्री . कळसूत्री बाहुली ; पुतळी . सांगडा - पु . सांगड ; भोपळयाचें पेटें . सांगडी , सांगडया - वि . सांगड नेणारा ; नावाडी सांगडिया सत्वर येईबा । - देप ४ . सांगोड - स्त्री . ( गो . ) सांगड ( दोन होडयांची ) करून तीवर देवतेचा रथ ठेवून तळयांत मिरवणूक काढतात ती . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP