|
पु. १ सपाटा ; तडाखा ; थप्पड ; चपराक . ( क्रि० मारणें ; देणें ). २ पूर्णनाश ; उध्वस्तता ; ओसाडी ; दाणादाण ; रुक्षता ; वैराणपणा ( जाळपोळ , बंडाळी इ० मुळें प्रदेशाचा ). निकाल ; पूर्णक्षय ; समूळ नाश ( लोकवस्ती , वंश , कुल , गुरेंढोरें वगैरेचा सांथ , रोग वगैरेमुळें ); पार संपणें ; खपून जाणें ; सरणें ( एखादापदार्थ , संपत्ति , जिंदगी - खाण्यामुळे , उधळपटटीमुळें वगैरे ). ( क्रि० वळणें ; उडणें ; होणें , वळवणें ; उडवणें ; करणें ). [ अर . सफ्फ = राग , ओळ ; ध्व . ] - क्रिवि . अगदी ; समूळ ; पूर्णपणें ; मुळीच . तो तर माझे बोलणें सप्फा ऐकत नाही .
|