Dictionaries | References

संभ्रम

   { sambhrama }
Script: Devanagari

संभ्रम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hurry, flurry, flutter, fluster, confused and precipitate state of mind. 2 Eagerness, impetuous ardor, vehemence or forwardness of desire. Ex. कांहीं नवा पदार्थ पाहिला म्हणजे त्याचें संपा- दन करावें हा सं0 त्या मनुष्यास फार आहे. 3 S Reverencing, exalting, honoring. Ex. सदा विरक्त आणि निष्काम ॥ नावडे लौकिकसंभ्रम ॥. Hence, with the license of popular speech, An act in honoring, adorning, dressing up, delighting, gratifying &c. Ex. चक्रीदार पागोटें घालावें गंध रेखून लावावें डौलानें चालावें असे हा दिवसभर आपल्या जिवाचे स0 करीत असतो. 4 S Turning round, whirling, revolving. 5 S Error, confusion, misapprehension, bewilderment.

संभ्रम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Hurry, flutter, confused state of mind. Eagerness, impetuous order. Confusion, error.

संभ्रम     

ना.  गडबड . गोंधळ , घोटाळा , भ्रांती .

संभ्रम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था   Ex. मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.
SYNONYM:
गोंधळ बुचकळा

संभ्रम     

पु ( प्र . ) समारंभ . हाचि हवन संपदेचा संभ्रमु । - ज्ञा ८ . ५१ . होते श्रीकृष्णविंदान । जे संभ्रमें पर्णावी रुक्मणी । - एरुस्व १४ . ३० .
 पु. १ भ्रांति ; गोंधळ ; घोटाळा ; गडबड ; मोह . ना तरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतला तापसु भ्रमें । - ज्ञा १ . २७१ . मग लोपिला अदभुतु । संभ्रमु तो । - ज्ञा १ . १५१ . २ औत्सुक्य ; तीव्र इच्छा ; आकांक्षा ; उत्कंठा . मग संभ्रमें दिठीसेने । घालितसे । - ज्ञा १ . १६७ . ३ आदर ; सन्मान ; स्तुती . अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहे जैसा ये व्यक्ति । - ज्ञा १३ . १८१ . नावडे लौकिक संभ्रम । यावरून डौल , नटटापटटा , ऐट ४ भ्रमण ; गरगर फिरणें ; भोवरा ; चक्राकार गति संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साठी होईल तुझ्या । - तुगा २७१३ . ५ पसारा ; अवडंबर . आणिकही नाना संभ्रम । व्रतांचे ते । - ज्ञा १८ . ९९ . ६ चूक ; हयगय ; गोंधळ ; गैरसमज . [ सं . सम् ‍ + भ्रम ] संभ्रमी - वि . सन्मान्य ; सत्कारित ; आदर केलेला संभ्रांत - वि . १ गोंधळलेला ; गडबडलेला ; घोटाळा ; उडालेला ; भ्रांतिष्ट . येतुलेया सली । सभ्रांताच्या पोटी । - ज्ञा १३ . ९०६ . २ व्यग्र ; उत्कंठित ; आवेशपूर्ण ; त्रस्त .

संभ्रम     

संभ्रम [sambhrama]   a.
Agitated, excited.
Rolling about (as the eyes); या ते दशाश्रुकलिताञ्जनसंभ्रमाक्षम् [Bhāg.1.8.31.]
संभ्रमः [sambhramḥ]   1 Turning round, whirling, revolving.
Haste, hurry.
Confusion, flurry; दृष्टः सप्रेम देव्या किमिदमिति भयात् संभ्रमाच्चासुरीभिः [Ve.1.3;] [Mb.7.13.48.]
Fear, alarm, fright; [Ś.1;] मुह्यत्वेव हि कृच्छेषु संभ्रमज्वलितं मनः [Ki.15.2.]
Error, mistake, ignorance.
Zeal, activity.
Respect, reverence; गृहमुपगते संभ्रमविधिः [Bh.2.64;] तव वीर्यवतः कश्चिद्यद्यस्ति मयि संभ्रमः [Rām.]
Uproar, tumult.
Ignorance.
Agitation, anxiety; त्यज शोकं च मोहं च संभ्रमं दुःखजं तथा [Rām.2.6.5;] विश्रब्धं गच्छ शैनेय मा कार्षीर्मयि संभ्रमम् [Mb.7.111.51.]
Delusion; 'संभ्रमो भ्रान्तिहावयोः' इति विश्वः; अथ दीर्घतमं तमः प्रवेक्ष्यन् सहसा रुग्णरयः स संभ्रमेण [Ki.13.3.] -Comp.
-ज्वलित a.  a. excited by agitation.
-भृत् a.  a. embarrassed, flurried.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP