-
स्त्री. १ दागिने तयार करतांना , घासतांना , कानसतांना त्यांचे गोळा न करतां येण्यासारखे परमाणू उडाल्यानें मूळ वजनांत येणारी तूट . गाळणींत , घाट करण्यांत अगर वहिवाटींत लागलेली घट खर्च घालण्याची मंजूरी देणें . ( बडोदें ) खानगी खात्यांतील अंमलदारांचे अधिकार १७८ . २ धान्य मापतांना , तूप इ० पदार्थ तोलतांना मूळ मापांत - वजनांत होणारा कमीपणा ; तूट ; घस . आमचा माल निर्मळ असून त्यांत घट फार निघाली अशा प्रकारचे पुष्कळ बोभाटे नेहमीं पत्रांतून येतात . - मुंव्या प्रस्तावना ५ . ३ नुकसान ( गळती , नास , आटणी इ० मुळें झालेलें ); तूट . ( क्रि० येणें ; लागणें ). हाली शिक्याला घटती कीं बढती ? ४ ( सामा . ) र्हास ; उतार ; कमती होणें . ( क्रि० येणें ; लागणें ). ५ ( मातकाम ) घोटकाम करतांना किंवा कोरीव काम करतांना खालीं पडलेली माती . [ सं . घट = घासणें , हलवणें , मारणें ; हिं . घटना , घटती ]
-
पु. १ पाणी इ० ठेवण्याचें भांडें ; घडा ; घागर असे पृथ्वी । - ज्ञा १३ . ८७२ . २ नवरात्रांत उपास्य देवतेजवळ पाण्यानें भरून ठेवलेली मातीची घागर ; घडा ; कलश ; नवरात्र बसणें ; विशेष प्रकारची देवीची पूजा . ३ ( ल . ) विश्व ; ईश्वरानें निर्माण केलेलें यच्चयावत जगत ; शरीर इ० सृष्ट जीव , पदार्थ . म्हणौनि प्राणिजाताच्या घटीं । ४ वाद्यविशेष . दक्षिण हिंदुस्थानांत मातीचा माठ पालथा घालून त्याच्या पाटीवर दोन्ही हातांनीं तबल्यासारखें वाजवून गायनाची साथ करतात . ५ नवरात्राकरितां कुंभाराकडून मातीची घागर घेण्याचा हक्क . [ सं . घट ] ( वाप्र . ) घटीं बसणें - अक्रि . १ ( नवरात्र इ० कांत ) आराध्य देवता घटावर अधिष्ठित होणें ; देवतेची स्थापना होणें . २ घटस्थापन करणारा यजमान अथवा उपाध्याय यानीं घट असेपर्यंत व्रतनियमानें असणें . ३ ( ल . ) ( आजारामुळें - आळसानें किंवा कांहीं कारणानें ) घरांत बसून असणें . ४ ( स्त्रीनें ) विटाळशी होणें ; अस्पर्शपणामुळें निरुद्योगी बसून असणें . सामाशब्द -
-
न. ( गो . ) सोंगटया वगैरेच्या पटांतील घर .
-
वि. ( प्र . ) घट्ट , घट्ट पहा .
Site Search
Input language: