Dictionaries | References श श्लाघणें Script: Devanagari Meaning Related Words श्लाघणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To praise, commend, applaud. श्लाघणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. स्तुति करणें ; धन्य मानणें ; आनंद मानणें ; वाखाणणें ; मोठेपणांस चढणें . आइकोनि श्लाघत असो अंतःकरणीं । - ज्ञा ६ . १४२ . म्हणोनि विश्वरूप लाभें श्लाघे । - ज्ञा ११ . ६२३ . [ सं . श्लाघ् ] श्लाघनीय . श्लाघ्य - वि . स्तुत्य ; वाखाणण्याजोगा . श्लाघा - स्त्री . स्तुती ; बढाई ; डौल ; थोरवी ; गौरव ; प्रशंसा . श्लाघिजणें - अक्रि . श्लाघ्य होणें . तरीच हरीदास म्हणवितां श्लाघिजे - तुगा ११०३ . श्लाघ्यता - स्त्री . गौरव ; थोरपणा ; मोठेपणा . ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जीवी । - ज्ञा १८ . १६७ . श्लाघ्यवाणा - वि . १ योग्य ; स्तुत्य ; चांगले ; लाभदायक . म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व काहीं । - दा ६ . १ . ३ २ ( अशिष्ट चुकीनें श्लाघ्य याच्या विपरीत अर्थी ) गरीब ; कींव करण्याजोगा ; लांजाळू ; लाजिरवाणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP