Dictionaries | References श शेंदाड शिपाई Script: Devanagari Meaning Related Words शेंदाड शिपाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक मनुष्य आपला पराक्रम दाखविण्यासाठीं शेंदाडावर तरवार चालवून दाखवीत असे. एकदां परचक्र आलें असतां व त्यास पुढें केलें असतां तो पळून गेला. किंवा, एका शौर्याची फुशारकी मारणार्या माणसाच्या अंगावर तो रात्रीं घरांत शिरताना शेंदाडें मारिलीं असतां तो भिऊन ओरडूं लागला. यावरुन केवळ शेंदाडें कापणारा शिपाई म्हणज़े घरींच पराक्रम दाखविणारा पण रणांगणावरुन पळून जाणारा भित्रा, भेकड मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP