-
क्रि.वि. ( कों . ) प्रत्येक घरागणीक ; घरोघर ; प्रत्येक घरीं ; एकहि घर न वगळतां ; त्यानें घरटी काठी चालू आहे इतका नारूचा उपद्रव डोळयांनीं पाहिला . - खेया २५ .
-
स्त्री. १ ( कों . ) प्रत्येक घराचा , कुटुंबाचा वर्गणींतील , वांटणींतील भाग , हिस्सा ; घरपट्टी . २ ( राजा . ) वर्गणी , पट्टी , दंड , देणग्या देण्याच्या किंवा घेण्याच्या बाबतींत स्वतंत्रपणें मोजलेलें प्रत्येक घर [ घर + पट्टी ]
-
पु. स्त्री . १ घिरटी ; धान्य भरडण्यासाठीं , दळण्यासाठीं केलेलें मोठें जातें . हिरे , माणकें , मोतीं , सर्व जबरदस्त घरटाखालीं घालून त्यांचा चुरा केला . - वज्राघात ६६ . २ ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें . ३ दळणारा ; धान्य इ० दळून पोट भरणारा ; घरट भुसारी याजवर मोहतर्फा मलिक बरी याचे कारकीर्दीपासून होता तो ... - मसाप २ . १६३ . ४ - स्त्री . न . गस्त ; घिरटी - मनको . [ सं . घरट्ट = मोठें जातें ]
-
स्त्री. ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें , जातिणी ; घरट . - वि . घरटांत घालून भरडलेलें भात . [ सं . घरट्ट ; म . घरट ]
Site Search
Input language: