Dictionaries | References

शिट

   
Script: Devanagari

शिट     

 स्त्री. पक्ष्यांचा मल , विष्टा . शीट पहा . शिटवा - पु . ( राजा . ) वाघळाची , पाखराची विष्टा ; शीट , शिटणें - क्रि . विष्ठा टाकणें . ( पक्ष्यादिकांनी ); मळ थोडा पडत असेल तेव्हां लहान मुलांसंबंधींही उपयोग करितात . २ घोडीनें उनाड सुटून हलक्या प्रतीच्या घोडयांपासून मैथून करून घेणें . शिटवा - पु . ( राजा . ) वटवाघूळ , पक्षी इ० ची विष्टा , शिट पहा . शिटाऊ , शिटाव , शिटवा - वि . ( ग्राम्य ) १ एखाद्या मरतुकडया घोडयापासून झालेलें ( शिंगरू ), शिटलेल्या घोडीपासून झालेला वाईटसाईट ( घोडा इ० ). २ ( ल . ) क्षुद्र , अकुलीन हरामी इसमाबदल वापरावयाचा अपशब्द ; छाकटा ; हलकट ; पाजी ; हीन ; नीच . ३ ( अशिष्ट ) धूर्त ; हुषार ; लबाड ; बिलंदर , सोदा अशा अर्थानें लहान मुलाबद्दल योजतात .
०बंदर  न. लबाड , सोदे , भामटे वगैरे तर्‍हेच्या लोकांनीं भरलेलें बंदर . गुरुजी ह्यापरिचे । शिष्य शिटाऊ बंदरीचे .
०बंदरी वि.  धूर्त ; ठक ; लबाड ; सोदा . शिटाचें शिंगरू - न . शिटलेल्या घोडीपासून झालेलें शिंगरू ; हीन अवलादीचें शिंगरूं . शिटावणें - क्रि . लबाड , लुच्या बनणें , होणें ; खोडया करण्यास प्रवृत्त होणें ; बिघडणें ( मुलांसंबंधीं प्रयोग ). [ शिटाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP