|
वि. १ शोक , हर्ष , भय इ० कानी व्याप्त , आर्त , ग्रस्त . २ शारीरिक - मानसिक वेदनांनी पीडित झालेला ; बेचैन ; विव्हळ . हरिणास एक बाण लागतांच व्याकुळ होऊन पडला . ३ मग्न ; लुब्ध ; आपन्न याअर्थी लेखांतून पुढील शब्दांशी संयोग करून वापरतात . हर्ष , आशा , आनंद , क्रोध , काम , चिंता , क्षुधा , इ० ४ ( ल . ) चंचल . प्रतिबंब सूर्य ते व्याकुळ होणे . चंचळ मानसे व्याकुळला । - दावि १७ . ९ .
|