-
स्त्री. १ रात्र . सुग्रीव म्हणे यत्नें लंकेचें भस्म जा करा रातीं । - मोरामायणें युध्द ५५७ . २ रातकिडा . [ सं . रात्रि ; प्रा . राती ; हिं . पं . गुज . बं . उरिया रात ; सिं राति ; पोर्तुजि . अराची ] म्ह० ( गो . ) रातचे बोल दिसाक पोल = रात्रीचे बोल दिवसाच्या वेळीं फोल होतात . रातच्यारात - क्रिवि . रात्रभर . सामाशब्द - रातकिडा - पु . रात्रीं किर्र आवाज काढणारा एक किडा ; वेळप्रसंग . रातबिरात आहे , चार जिन्नस घरांत बाळगून ठेवावे . - क्रिवि . संकटकालीं ; रात्रींबेरात्रीं . धान्य घेऊन ठेवावें , रातबिरात उषयोगी पडेल . [ हिं . रात + बिरात ] रातवडा - पु . ( गो . ) एका रात्रीचें काम . रातवणी - न . ( बायकी ) रात्रीं हातपाय धुण्याकरितां , शौचाकरितां किंवा पिण्याकरितां ठेवलेलें पाणी . [ रात्र + वणी = पाणी ] रातवा - पु . १ रात्रीचा सर्व काल ; रात्रपणा . ( क्रि० पडणें ; होणें ). २ रात्रीचा पाऊस . रातवा पडूं लागला ; रातव्याच्या पावसानें किंवा रातव्यानें बाजरी नासेल . ३ बुजूं नये म्हणून घोडयाला रात्रीं बाहेर काढणें . ( क्रि० देणें ) [ रात ] रातवा घेउन निघणें - रात्र असतांना निघणें . पावसानें रातवा धरला - पावसानें रात्रीं पडण्याला सुरुवात केली . रातसार - क्रिवि . रात्रभर . रातांधळा - वि . ज्याला रात्रीं मुळींच दिसत नाहीं असा ; रातांधळें प्राप्त झालेला . रातांधळें - न . एक नेत्ररोग . ह्यामुळें सुनुष्यादिकांस रात्रीं दिसत नाहीं . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रीच्या वेळीं . [ वात ] रातावणें - अक्रि . ( काव्य ) रात्र पडणें , होणें . रातावलें आतां जाऊं दे बाई घरा । [ रात ] रातिवळा - पु . ( कों . ) रात्रीं गुरांच्या पुढें टाकलेली वैरण किंवा ओलें गवत . रातिवा - पु . रात्रपणा ; रात्र . जे कांडाचेनि आंधारें । करिति रातिवा । - शिशु ९४४ . राती - स्त्री . १ ( काव्य ) रजनी ; रात्र . आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती । - भूपाळी घनश्यामाची २० . २ अंधार . [ सं . रत्रि ] रातीच्या रातीं - क्रिवि . ( कुण . ) रात्रीच्या मुदतींत ; रात्रीच्या रात्रीं . रातीदिवो , रात्रिदिवो - क्रिवि . रात्रंदिवस . तंव राहटवी रातिदिवो । - माज्ञा १८ . ५०४ . [ प्रा . ] रातोरात - क्रिवि . १ रात्रीच्या रात्रीं ; दिवसाची इ० वाट न पाहतां रात्रीच्या वेळीं . २ सर्व रात्र ; रात्रभर . हें पत्र म्यां रातोरात जागून लिहिलें ३ रात्रीच्या वेळीं , रात्र असतांना . एव्हां निघालास तर रातोरात पोंचशील . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रींच्या वेळीं . [ रात ] रात्र - स्त्री . १ रजनी ; रात्रि ; सूर्योस्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ ; पृथ्वी दैनंदिन गतीनें आपल्या आंसाभोवतीं फिरतांना तिचा सूर्यानें अप्रकाशित असलेला अर्धा भाग . २ रातकिडा ; झिल्ली . [ सं . रात्रि ] ( वाप्र . )
-
पु. ( कों . ) रक्तिमा ; तांबडेपणा ; डोळयांची आरक्त स्थिति . [ सं . रक्त ] रातंजन , रातांजन - पुन . एका झाडाचें नांव . [ रक्त + अंजन ] रातड - वि . किंचित् राता , तांबडा ( तांदूळ , विशिष्ट फळें डोळे इ० ), [ राता ] रातडी - तांबडया जोंधळयाची एक जात .
-
०ओरडणें झिल्लीच्या शब्दानें नादणें .
-
०वैर्याची अतिशय दु : खांत व हालांत रात्र जाणें . मरती रात्र झाली - शपथेचा एक प्रकार . बंदाखालीं बसणें पहा . सामाशब्द -
Site Search
Input language: