Dictionaries | References व वेळण Script: Devanagari Meaning Related Words वेळण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पेज . वेळिलें वेळण भाताचे । - ययादि १७ . ११३ . २ वेळवण - णी पहा . शेवया वळिल्या अतिकुसरी । असार वेळण सांडिलें दुरी । - एरुस्व १४ . ११३ . वेळणी - स्त्री . १ वेळण काढण्यासाठी केलेलें तव्यासारखें खोलगट पितळी भांडे . २ ( व . ) मडक्यावर झांकण ठेवण्याचें मातीचे भांडे . ३ झाकणी ; वाढणी . कां घडे गाडगे वेळणी । - एभा १३ . ३२४ . ४ वाडगा ; थाळी . त्या सापापुढे दुधाचि वेळणी ठेउनि । आपण घरासि आला . । - पंच ३ . १४ . [ सं . विल् = आच्छादणे - वेलनी ] वेळणें - उक्रि . १ ( शिजलेला भात , भाजी इ० ची ) पेज , पाणी निथळून काढणे . त्वरित परम तेथे भात हे वेळयेले । - सारुह ६ . ७२ . 2( कर्हाडी ) गव्हले , शेवया , इ० उकळून हलक्या हातानें हालवून पाणी निथळून काढणें . ३ गाळणें . वेळवण , वेळवणी - न . भाजी , डाळ , पुरण , इ० पदार्थ वेळून त्याचें जें पाणी काढतात तें [ वेळणें + पाणी . सं वन = पाणी यापासून मराठी प्रत्यय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP