Dictionaries | References

वेंचणी

   
Script: Devanagari

वेंचणी

  स्त्री. भाजी काढणी ; तोडणी ; तोड ; गोळा करणें . [ वेंचणें ] वेचणें , वेंचणें - सक्रि . १ एकेक टिपणें ; गोळा करणें ; एकेक उचलून एकत्र करणें . २ जमविणें ; सांठविणें . गंधविषया मिलिंद भुलोन । कमलकोशीं वेचिती । ३ निवडणें ; पसंत करून वेगळें काढणें ; बाजूस काढणें ; निवडून घेणें . त्यानें भारतांतील श्लोक वेंचून काढलें . ४ वजा करणें . एका एकुवेंचला । शून्य बिंदू शून्ये पुसिला । - अमृ . ७ . १७८ . [ सं . विच् ‍ = वेगळें करणें ; सं . वि + चि = गोळा करणें ] म्ह० नांव लक्ष्मी व गोर्‍या ( गवर्‍या ) वेची . वेंचला - वि . १ वेचक ; निवडून काढलेला ; बाजूस काढून ठेवलेला ; पसंत केलेला . २ विचारांत घेतलेला ; योग्य ठरविलेला ; विचारपूर्वक निवडून योग्य ठरविलेला ( विषय , मुद्दा ). ३ नियमित ; प्रमाणशीर ; योग्य ( खर्च इ० ). [ वेंचलेला ]
०घेणें   निवडणें ; वेचणें ; टिपणें . वेचा - पु . १ निवडक भाग ; उतारा ; एखाद्या ग्रंथांतून निवडून काढलेला उतारा , कांहीं श्लोक इ० . शब्दोदधीचे निवडून वेचे । - सारुह १ . ४६ . २ सारांश ; संक्षेप . ३ ( बहुधा अनेकवचनी उपयोग ) सारसंग्रह ; निवडून काढलेल्या भागांचा संग्रह ; मुख्य मुख्य भागाचे उतारे एकत्र करून झालेला ग्रंथ . उदा० मोरोपंती वेचे , वामनाचे वेचे इ० . ४ ( ना . ) शेतांतून कापूस गोळा करून आणल्यावर केलेली मोजणी . वेंचे वेंचे बोलणें - १ निवडक शब्दांत , निवडक शब्द , वाक्प्रयोग इ० योजून बोलणें . २ विचारपूर्वक , योग्य तितकें बोलणें ; मुखांतून वावगा शब्द जाऊं नये किंवा भलतेंच विधान केलें जाऊं नये अशी काळजी घेऊन बोलणें . ३ शहाणपणानें बोलणें . वेंचीक - वि . ( गो . ) निवडक ; वेचक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP