-
पु. चातुर्वण्यांतील चवथा वर्ण व त्या वर्णांतील व्यक्ति . इतर तीन वर्ण ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य हे होत . हा वर्ण विराट् पुरुषाच्या पायांपासून उत्पन्न झाला अशी समजूत आहे . २ ( ल . ) हा शब्द उपसर्ग रूपाने दुसर्या शब्दांस लाविला असतां त्या शब्दानें व्यक्त होणार्या पदार्थाचा काळासर , धूसर , असा प्रकार दर्शविला जातो . उदा० शूद्र हिरा = काळसर , मंद तेजाचा हिरा . तसेच शूद्र भांग - सबजी - पिंपळ वगैरे . [ सं . ]
-
०दोक न. शूद्राचा स्पर्श झालेले वस्त्र , पात्र , पाणी वगैरे . [ शूद्र + उदक ]
-
०मुखी वि. १ पांढर्या कपाळाचा ; कपाळास गंध नसलेला . २ पांढरे पायांचा व कपाळावर कोणतीहि खूण , चिन्ह नसलेला . ( घोडा ).
-
०लोक वि. शूद्राचा स्पर्श झालेले वस्त्र , पात्र , पाणी वगैरे . शूद्री - स्त्री . शूद्राची स्त्री . ; शूद्र जातीची स्त्री . - वि . शूद्रासंबंधी , शूद्राचे ( भाषा , वेष , रीत , विधि वगैरे ). शूद्रोदक - न . शूद्रदोक पहा .
Site Search
Input language: