Dictionaries | References

विल्हळ

   
Script: Devanagari
See also:  विल्हाळ

विल्हळ     

वि.  १ दीनवाणें ; करुण ; दुःखपूर्ण ( कथन , कहाणी , रडगाणें , कुरकुर ). जिवाचे विल्हाळ = जिवाचे हाल . २ अभद्र बोलणारा ; अपशकुनी ; अशुभ बोलणारा . [ सं . विव्हल् ‍ ] विल्हाळक - स्त्री . काकळूत ; पिरपिर ; कूरकुर ; रडगाणें . - वि . व्यर्थ ; निष्कारण . तुका म्हणे असे हातीचे कंकण । तपासी दर्पण विल्हाळक । - तुगा २७८१ . विल्हाळगौर - स्त्रे . नेहमीं कुरकुरणारी , पिरपिर लावणारी स्त्री ; दुर्मुखलेली , अभद्र , अशुभ बोलणारी , चिंतणारें स्त्री . विल्हाळणें , विल्हळणें - अक्रि . १ रडगाणें गाणें ; किरकिर करणें ; शोक करणें . २ ( ल . ) वाचतांना , बोलतांना रडका आवाज , सूर काढणें ; हेल काढणें . ३ नेहमीं मनांत अशुभ विचार आणणें ; अभद्र बोलणें , चिंतणें . विल्हाळया , विल्हळया - वि . १ रडतोंडया ; किरकिर्‍या ; पिरपिर्‍या ; रडया ; रडगाणें गाणारा ; तकरारी सांगणारा . २ अशुभ , अभद्र बोलणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP