-
कोरा चेक देणें
-
वि. १ ताजा ; नवा ; नवीन ; नुकताच केलेला ; न धुतलेला ; न उपभोगलेला ; न वापरलेला ( कागद , भाडें , वस्त्र , इमारत दुकान इ० ) २ ( ल .) ज्याला सराव किंवा राबता नाहीं असा ; नवशिका ( माणुस ). ३ न सुधारलेला बदललेला ; कांही परिणाम , फायदा ज्यावर होत नाहीं असा ; संस्कारहीन ( शिक्षण , शिस्त वगैरेनीं ),. ' हा बारा वर्षे पढत होता परंतु कोराचें कोरा .' ४ कमजास्तपणा , वाढ किंवा कांहीं परिणाम झाला नाहीं असा ( व्यवहार , व्यापार , माल ). ( फा . कोर्हा = नवेरं मडकें ; हि कोरा ; तुल० करा , कर्हा )
-
चेकवर रकमेचा आकडा न घालतां नुसता सही करून दिल्यावर चेक घेणाराला वाटेल तो आकडा घालण्याची मुभा असते. यावरून न विचारतां वाटेल ते केले, ठरविले तरी परवानगी असणे. ‘आम्ही मुसलमानांना कोरा चेक देऊन ऐक्य करूं व मग आम्ही इंग्रजांना घालवून देऊं.’ -के १४-९-३७.
-
०करकरीत वि. करकरीत पहा .
Site Search
Input language: