|
पु. पांगापांग ; विस्कटलेली स्थिति ; गोंधळ ; अस्ताव्यस्तपणा ( कामधंदा , व्यवहार वगैरेचा ). - वि . १ ओळंब्यांत नसलेली ( भिंत , दगड , वीट ). २ मिश्र ; भेसळीचा ; भलत्याच प्रकारचा , वाणाचा , वर्णाचा ( कपडा , नाणें , वस्तु ). ३ ( ल . ) विचित्र ; अनियमित ; गैरशिस्त ; असंबध्द ( वर्तन , भाषण , कृत्य ). विसंगत , असंबध्द ( बोलणें , बरळणें ). [ वि + थर ] विथरणें - अक्रि . अनिर्बंध वागणें ; बेताल होणें ; मार्ग सोडून जाणें .
|