Dictionaries | References व विंदान Script: Devanagari See also: विंदाण Meaning Related Words विंदान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Applied to the Deity, destiny, a statesman &c. Ex. प्राक्तनाचें विचित्र विंदान ॥ देवावरि काय बोल ठेवून ॥; also थोर कर्माचें विंदान ॥ वनीं रुदन करीत राजनंदन ॥; also ऐसें विंदान करूनि देव ॥ परीं हें कोण्हासीं न कळे लाघव ॥. विंदान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Craftiness. A device. विंदान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कौशल्य ; चातुर्य ; कारागिरी ; लाघव . जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे । - ज्ञा ७ . २१ . मांडिलें विंदान । ख्याल सुखाचें संधान । - तुगा १३३ . वेगीं विंदान पाहे माझें - एरुस्व ९ . १४ . २ कपट ; कारस्थान ; युक्ति ; व्यूह ; कावा . छळितयां विंदाणा - । माजीं जूं तें मी विचक्षणा । - ज्ञा १० . २८४ . आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु । - ज्ञा १३ . २७१ . ३ निग्रह ; वेध ; लक्ष . जैं इंद्रियां विंदाण लागे । - ज्ञा ६ . ३६५ . मुकलें पूर्वस्थान । स्वरूपाचें विंदान । - भज २६ . ४ लीला ; चमत्कार , चरित्र ; करणी ; गती मायेचें परम विंदाण । - रावि ६ . ६७ . ऐसें कर्माचें विंदाण । भोगिल्यावीण सुटेना । - शनि २०३ . केलें विंदाण ठाईंच । - दावि २ . ९५ . [ सं . विज्ञान ] विंदानी - वि . कुशल ; कारागीर . मंडपाची रचना हरुषें करी विश्वकर्मा विंदानी । - धवळे उ १४ . ऐसा व्यासें विंदाणिये । गीता प्रासादु सोडणिये । - ज्ञा १८ . ४४ . - पु . कारागीर . तरी आतां कोकुनामें विंदानी । - कथा २ . १५ . १०१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP