|
पु. आर्य पुराणप्रथेप्रमाणे खंडाचा विभाग . हे पुढील नऊ आहेतः - कुरु , हिरण्मय , रम्यक , इलावृत्त , हरि , केतुमाला , भद्राश्व , किन्नर , भारत . [ सं . ] न. पु. वर्षाचे ; वृष्टि . सवत्सर ; बारा महिन्यांचा काळ ; साल . पाऊस पडणे ; पर्जन्य . सांगे वातवर्ष आतपु घरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे । - ज्ञा ५ . ११४ . [ सं . तुल० जि . बेर्श ] सांवत्सरिक श्राद्ध ; वर्षश्राद्ध . सारी वर्षे प्रयागी प्रभु पदनिरतां त्यांसि भेटोनि तारी । - मो रामायणे २१ . [ सं .; तुल०फ्रेंजि . वेर्स ] ०गणना स्त्री. वर्ष मोजण्याची पद्धत . याच्या सौर व चांद्र अशा दोन गणना आहेत . ०ऋतु वर्षतु - पु . षडऋतूंपैकी एक ; श्रावण - भाद्रपद या दोन महिन्यांचा काल ; पावसाळा . वर्षण - न . वृष्टि ; पर्जन्य . [ सं . ] वर्षणे - अक्रि . वृष्टि करणे ( मेघाने ). - उक्रि . ( ल . ) वर्षाव करणे ; फेंकणे ( बाण , फुले , गारा इ० ). तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताति निरंतर । - ज्ञा १ . १६६ . वर्षा वर्षाकाल - ऋतु - स्त्री . पु . पावसाळा ; वर्षर्तु . - ज्ञा १५ . २८५ . वर्षाव - पु . ०गांठ स्त्री. वाढदिवस . ( पूर्वी दरसाल जन्मदिवशी दोरीला एकेक गांठ देऊन त्या गांठीवरुन वय मोजण्याची चाल असे ). पाऊस . ०धात स्त्री. वर्षाचे सामर्थ्य ; वर्षफल ( मानवी व्यवहारावर परिणाम करणारे ). ( क्रि० जपणे ; सांभाळणे ). [ वर्ष + धातु = वीर्य ] वृष्टि ; फेंकणे ; भडिमार ( फळे , फुले इ० चा ) ०वर्षित वि. वृष्टि झालेला ( ल . व शब्दशः ) वर्षाव वर्षाव पहा . वाढावयालागी पुढती । सरसावली द्रौपदी सती । जैसा मेघ वर्षोन मागुती । वर्षोव करीअद्भुत । - ह ३४ . २७ . ०प्रतिपदा स्त्री. चैत्र शुद्ध १ ; गुढीपाडवा . ०फल न. ज्योतिषाच्या आधारे नव्या वर्षांत घडणार्या गोष्टींचे केलेले भविष्य ( पाडव्याच्या दिवशी हे वाचतात ); वर्षभविष्य . ०वीण वि. वर्षाला विणारी ( गाय , म्हैस ). ०वृद्धि स्त्री. एकाच राशींत गुरु राहतो ते वर्ष . ०सण पु. लग्नाला वर्ष पूर्ण होते त्या प्रसंगी जांवयास दिलेली मेजवानी , अहेर इ० . वर्षल स्त्री . वतन इ० उपभोगण्याच्या पाळीचे वर्ष ; उत्पन्नाचे वर्ष . - पु . वर्षाचा वतनदार , पाळीदार . वर्षाचा दिवस सण पु . वर्ष श्राद्धाचा दिवस . वाढदिवस . सणाचा दिवस . ( तो दिवस वर्षांतून एकदांच येतो म्हणून ). वर्षाचा हा सण । करावा गोड सख्या आपण । - प्रला . वर्षादिसाचा दिवस - पु . वर्षाचा दिवस अर्थ १ , २ पहा . वर्षानकाळ - वर्ष - क्रिवि . प्रतिवर्षी . अनेक वर्षे ( टिकणे , इ० ). नवर्याला सोडून बायकांनी वर्षानवर्ष माहेरी राहणे म्हणजे वनवासच होय . - सवतीमत्सर ९४ . [ वर्ष आणि ( अन ) वर्ष ] वर्षायु - वि . ( खा . ) एक वर्ष टिकणारा . कापसाची एक जात . वर्षासन , वर्षाशन - न . वार्षिक नेमणूक ; उदरनिर्वाहासाठी ब्राह्मण इ०कास प्रतिवर्षी नियमाने धन , धान्य इ० देतात ते ( याबद्दल चाकरी करावी लागत नाही ). दरवर्षी करावयाची गोष्ट , देण्याचे द्रव्य इ० तंव इंद्राचे वर्षासन । प्रतिवर्षी करावे हवन । - कथ ४ . ५ . ९३ . वर्षासनदार - पु . वर्षासन असणारा माणूस ; नेमणूकदार . वर्षिल - पु . पालटवाटा . - आडिवर्याची महाकाली ( प्रस्तावना ) ११ . वर्षल पहा . वर्षिलदार - वि . वर्षाच्या पाळीचा हक्कदार . वर्षोगणति - स्त्री . वर्षांत , वर्षांनी मोजणे . - क्रिवि . वर्षांनी ( मोजणे इ० ). वर्षोवर्षे - क्रिवि . कित्येक वर्षे ; वर्षे पर्यंत . दरसाल . वर्सल - स्त्री . वर्षल पहा .
|