Dictionaries | References

वरपडा

   
Script: Devanagari
See also:  वरपड , वरिपडा

वरपडा

 वि.  
   प्राप्त . - ज्ञा ६ . १६८ . पांडवां वरपड न व्हावे । - मुवन १२ . ४७ .
   स्वाधीन ; वश . - ज्ञा २ . ३४९ . वरपडा होसि तूं काळा । - देप ७१ .
   आसक्त ; ताबेदार ; वश . जैसा योगी होय आत्मज्ञाना । वरपडा पै । - कथा ४ . ६ . ११२ .
   व्याप्त ; मग्न . दुःखा वरपडा होता जाला । - दा ३ . १ . ४८ .
   विव्हल ; दुःखी . तै वरपडा होय अरण्यशोके । - मुसभा ८ . १६३ . - कथासा ३२ . ११४ .
   पात्र ; योग्य . म्हणोनि स्वधर्मु हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील । - ज्ञा २ . २०१ . वरिपडणे - अक्रि .
   प्राप्त होणे . तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रावाढी देव्हडी । - ज्ञा १५ . १०० .
   गुंतणे ; वरपडा होणे . वरिपडिले भवपाशे । - दावि ८४ .
   गोंधळणे ; कांही कळेनासे होणे .
   बुडणे ; मग्न होणे . सेवटी होए तापा वरिपडे । दुःखाग्निमाजी । ऋ ५४ . वरिपडी - स्त्री .
   मिठी . - एभा ६ . ५७ .
   उडी ; झडप ; लुब्ध होणे . ऐशी डोळ्यांआवडी । म्हणोनि कामिनी वरिपडी । - एभा १ . २९४ .
   गर्दी . ब्रह्मादिकांचिया वरिपडी । बखलुनि कोणाचे ताट काढी । - भाए १३२ .
   ( महानु . ) पूर्वपद ; आश्रयस्थान . तया सन्निधानाची बेडीजया नव्हेचि वरपडी । - भाए ५० . [ ? वर + पडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP