Dictionaries | References ल लोणी Script: Devanagari Meaning Related Words लोणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जाक कडोवन तूप करतात असो धंय चाळून वयर येवपी दाट चिकचिकीत पदार्थ Ex. श्रीकृष्णाक लोणी खूब आवडटालें HYPONYMY:दीख ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मसकोWordnet:asmমাখন benমাখন gujમાખણ hinमक्खन kanಬೆಣ್ಣೆ kasتٔھنۍ malവെണ്ണ marलोणी mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯃꯄꯥꯟ nepमक्खन oriଲହୁଣୀ panਮੱਖਣ sanनवनीतम् tamவெண்ணெய் telవెన్న urdمکھن , مسکہ लोणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Butter. v काढ, निघ, ये. लोण्याची कणी or लोण्याचें बोट A mere granule or a finger-tip of butter. See under कवडी. लोण्याची कढी करणें To serve out butter plentifully. लोण्याची सवत न साहणें Not to be able to put up with a rival-wife soft and mild as butter. लोण्याच्या पुऱ्या तुपांत तळणें To prescribe or purpose for an occasion which can never come to pass; as अवसेस एकादशी झाली तर? लोण्यांत दांत फुटणें To become savage and haughty--a person of a mild and gentle disposition. लोणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Butter.v काढ, निध, ये. लोणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सायीचे दही घुसळल्यावर निघणारा स्निग्धांश Ex. कृष्णाला लोणी आवडायचे HYPONYMY:साजूक तूप ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नवनीतWordnet:asmমাখন benমাখন gujમાખણ hinमक्खन kanಬೆಣ್ಣೆ kasتٔھنۍ kokलोणी malവെണ്ണ mniꯁꯪꯒꯣꯝ꯭ꯃꯄꯥꯟ nepमक्खन oriଲହୁଣୀ panਮੱਖਣ sanनवनीतम् tamவெண்ணெய் telవెన్న urdمکھن , مسکہ लोणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. दूध , दही घुसळले असतां त्यांतून जो स्निग्धांश निघतो तो . [ सं . नवनीत ; प्रा . नोणीअ ; पं . नौणी ; हिं . नौनी ]०खाऊन देणे - स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणे ; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्त्व व किरकोळ स्वरुपाचा भाग उदार होऊन दुसर्यास देणे . हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वांट्यास देतात . - टि २ . ५१२ .ताक देणे - स्वतःचा स्वार्थ साधून मग परार्थ पाहणे ; मुख्य भाग आपण घेऊन निःसत्त्व व किरकोळ स्वरुपाचा भाग उदार होऊन दुसर्यास देणे . हजार युरोपियन कामगार सर्व लोणी खाऊन ताक मात्र आमच्या वांट्यास देतात . - टि २ . ५१२ .०लावणे खुशामत करणे ; मनधरणी करणे ; मिनत्या करणे . लोण्याची कढी करणे लोणी वाटेल तितके किंवा विपुलतेने वाढणे . लोण्याची सवत न साहणे शांत आणि लोण्याप्रमाणे मऊ अशीहि सवत असह्य होणे ; विरोध सहन न करणे . लोण्याच्या पुर्या तुपांत तळणे अशक्य गोष्टी शक्य होणे ; न घडणार्या गोष्टीची चिकित्सा करणे . लोण्यांत दांत फुटणे अत्यंत सौम्य स्वभावाचा मनुष्य असभ्य , रागीट आणि कठोर असा होणे . लोण्यास दांत फुटणे आपण ज्याचे लालन , पालन , पोषण केले त्याने आपणाशी कृतघ्नपणे किंवा अमर्यादपणे वागूं लागणे . लोण्याची कणी , लोण्याचे बोट स्त्रीन . अगदी किंचित लोणी ; कणीएवढे लोणी ; बोटाला चिकटलेले लोणी ; इवलेसे लोणी . लोण्याचे आयसिंग न . लोण्यापासून चोटी चुरम्याची तुकडे पाडून केलेली बर्फी . - गृशि १ . ४४४ . लोणकढा वि . ताजा ; अगदी नवा ; कोरा करकरीत ; नवीन ; साजूक . ( अगदी ताज्या कढविलेल्या लोण्याप्रमाणे ). [ लोणी + कढणे ] लोणकढी , लोणकढीथाप वार्ता बातमी गोष्ट खबर , लोणकढे वर्तमान स्त्रीन . समयानुसार ठेवून दिलेली थाप ; खोटी बातमी ; गंमतीखातर आणि गंभीर मुद्रेने सांगितलेली खोटी खबर . पण मला आपण आपली तसबीर द्यायची कबूल केली ना ? कां लोणी कढवून तयार केलेले ताजे तूप ; साजूक तूप . लोणकढे दारिद्र्य न . नुकतेच आलेले दारिद्र्य . लोणकाप्या , लोणीकाप्या वि . बोथट ; धार नसलेला ( चाकू , सुरी इ० ). लोणट वि . लोण्याच्या वासाचे किंवा चवीचे . लोणणे सक्रि . ( व . ) घोटणे ; आहाटणे ; घाटणे ; वरणाची डाळ शिजल्यानंतर ती लोण्यासारखी मऊ करणे . लोणस वि . ( कों . )सत्वस ; कसदार ; ज्यामध्ये लोण्याचा अंश पुष्कळ आहे असे ( दूध , दही ).जीच्या दुधापासून पुष्कळ लोणी मिळते अशी ( गाय , म्हैस इ० ). लोणी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 लोणी See अम्ल-ल्°. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP