Dictionaries | References

लिखणे

   
Script: Devanagari

लिखणे     

स.क्रि.  ( काव्य . कुण . ) लिहिणे . [ सं . लिख ; हिं . लिखना ] लिखन - न .
लिहिणे ; लेखन .
लिहिलेला कागद ; लिखाण ; लिहिलेले पुस्तक . [ सं . ] लिखा - पु .
लेख ; दस्तऐवज .
हिशेबाच्या ; नोंदीच्या ( वह्या ). यजमानकृत्याच्या लिख्याच्या व नामावळीच्या वह्या त्रिवर्ग सरकत्यांनी नेल्या आहेत . - वाडसमा ३ . ६४ . म्ह० एक लिखा हजार बखा . ( बखा हे रुप बका बक चे अनेकवचन आहे . यमक साधण्यासाठी क चा ख झाला ). लिखाई - स्त्री . ( खा . ) वारंवार पडणारा पत्रव्यवहाराचा त्रास . लिखापढा - पुसा - पु .
कायद्याचे , फिर्यादीचे , सरकारी कामाचे कागद .
दस्तऐवज ; लेख ; सनद ; लेखपत्र .
( सामा . ) कोणताहि लेख ; लिखाण . - वि . सुशिक्षित . [ हिं . लिखना + पढना ] लिखापढी - स्त्री . लेखी व्यवहार ; कागदावर लिहिले लिहिले जाणे ; निश्चित होणे . ( क्रि० करणे ). लिखावट - स्त्री . लिखाई ; लेख लिहिणे ; लिपी . लिखित - न . पत्र ; चिठ्ठी ; लेख ( हातांनी लिहिलेला ). लिखित पाठविले सकळ नृपां कैसे । - र ११३ . - वि .
लिहिलेले .
काढलेले ; आंखलेले ; रेखाटलेले ; चित्रित . [ सं . ] लिखितार्थ - पु . पत्री लिहिलेला मजकूर ; एखाद्या पत्राचा , लेखाचा अर्थ - सारांश - उद्देश इ
०लिखे  न. लिखाण ; लेखन . बसोन ससांग लिखे करी । - दावि २५१ . [ सं . लिख = लिहिणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP