Dictionaries | References

लिकलिकणे

   
Script: Devanagari

लिकलिकणे     

अ.क्रि.  लुकलुकणे ; मंद प्रकाशाने चमकणे ; मध्ये मध्येच एकदम चमकणे ; ( बारीक पदार्थ ) थांबून थांबून प्रकाशित होणे ; ( लकलकणे व लिकलिकणे या दोन शब्दांच्या अर्थात थोडा भेद आहे ). [ ध्व ; किंवा सं . लोक ] लिकलिक - स्त्री . मरणवेळचा किंवा आजारपणांतील डोळ्यांतील निस्तेजपणा ; मिचमिचीतपणा ; फिकटपणा ; मालवत्या दिव्याचा अंधुक उजेड ; किंचित चकाकी ; चमक ; लुकलुकी . ( क्रि० राहणे ; होणे ; करणे ; दिसणे ) ( लिकलिकी आणि लकलकी यांच्यात पहिल्याचा अर्थ चमक किंवा अंधुक तेज असा आहे व दुसर्‍याचा लख्ख प्रकाश , झगझगीत उजेड , डोळे दिपवून टाकणारा प्रखर प्रकाश असा आहे ). - वि . विलकिलित ; थोडी उघडलेली . माडीवरील मंडळींपैकी एक अमळ खिडकी लिकलिकी करुन खाली पाही . - नि ३४५ . लिकलिकीत - वि . चमकणारा ; लुकलुकणारा ; चकचकीत . मध्येच चमकणारा ; थांबून थांबून प्रकाशणारा ; चंचल प्रकाशयुक्त . अंधुक प्रकाशाचा ; जात आलेल्या तेजाचा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP